Agri Business News vegetables arrival become slow Mumbai Maharashtra | Agrowon

मुंबई बाजार समितीत भाजीपाल्याची आवक मंदावली

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 मे 2020

मुंबई : मुंबई बाजार समितीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने अनेक व्यापाऱ्यांनी बाजारात येणे बंद केले आहे. त्यामुळे बाजारात सध्या केवळ २५ ते ३० टक्केच व्यापारी माल मागवत आहेत. परिणामी भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. कांदा-बटाट्याची आवकही थांबली असल्याने हे बाजार नावापुरतेच सुरू असल्याची स्थिती आहे. मात्र बाजारात माल येत नसला, तरी मालाच्या गाड्या थेट मुंबई आणि उपनगरात जात असल्याने भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत सुरू आहे.

मुंबई : मुंबई बाजार समितीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने अनेक व्यापाऱ्यांनी बाजारात येणे बंद केले आहे. त्यामुळे बाजारात सध्या केवळ २५ ते ३० टक्केच व्यापारी माल मागवत आहेत. परिणामी भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. कांदा-बटाट्याची आवकही थांबली असल्याने हे बाजार नावापुरतेच सुरू असल्याची स्थिती आहे. मात्र बाजारात माल येत नसला, तरी मालाच्या गाड्या थेट मुंबई आणि उपनगरात जात असल्याने भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत सुरू आहे.

घाऊक कांदा-बटाटा बाजारात नेहमी सर्व मिळून १६० ते १८० गाड्या माल येत असतो. आता ही आवक ४० ते ५० गाड्यांवर आली आहे. हीच परिस्थिती भाजीपाला बाजारातही आहे. येथे ५०० ते ६०० गाड्यांऐवजी केवळ ८० ते ९० गाड्या येत आहेत. सध्या बाजारात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. अनेक व्यापारी, अधिकाऱ्यांनाही ‘कोरोना’ची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता अनेक व्यापाऱ्यांनी आपला व्यापार बंद ठेवला आहे. जो काही थोडा माल बाजारात येतो, तितकाच विकला जात आहे. त्यामुळे बाजारात होणारी मालाची आवक थांबल्यातच जमा आहे.
असे असले, तरी किरकोळ बाजारातील मालाचा पुरवठा मात्र कायम आहे.

कारण भाजीपाला, कांदा-बटाटा या मालाचा थेट पुरवठा किरकोळ बाजारात होत आहे. बाजार समितीच्या आवारात न येता दररोज भाजीपाल्याच्या, कांदा-बटाट्याच्या ५०० ते ५५० गाड्या थेट जात आहेत. शिवाय अनेक सोसायट्यांमध्ये स्वयंसेवी संस्था शेतकऱ्यांकडून थेट शेतीमाल मागवून त्याची विक्री करत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात मागणीइतका पुरवठा होत आहे. परिणामी, घाऊक बाजारात माल कमी झाल्याचा कोणताच परिणाम किरकोळ बाजारावर झाल्याचे दिसत नाही.


इतर बाजारभाव बातम्या
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात गुळाच्या नियमित आवकेस...कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या पंधरा...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते २६०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १५० रुपयेकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
कळमना बाजारात मोसंबी दरात सुधारणानागपूर : मागणीअभावी संत्रा दरात घसरण झाली आहे....
औरंगाबादमध्ये गाजर सरासरी १८०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत वाटाणा ३००० ते ४५०० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपयेजळगावात २५०० ते ३५०० रुपये दर जळगाव : ः...
नाशिकमध्ये वांग्यांना सरासरी ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबाद : हिरवी मिरची सरासरी ३०००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत ढोबळी मिरचीची पंधरा क्विंटल आवकपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये...पुण्यात २००० ते ३००० रुपये पुणे : पुणे बाजार...
पपई दर निम्म्यावर; शेतकऱ्यांना फटका जळगाव : खानदेशात गेल्या २० ते २५ दिवसात...
मक्‍याच्या बाजारभावात दौंडमध्ये २००...दौंड, जि. पुणे : दौंड तालुक्‍यात मक्‍याची आवक...