एनसीडेक्सला वायदे बंदीचा फटका 

एनसीडेक्सच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार , केंद्र सरकारकडून बिगर बासमती, गहू, तांदूळ, चना, मोहरी, मोहरी तेल व पेंड सोयाबीन आणि इतर घटक, मूग आणि कच्चा पाम तेल या कमोडिटीजच्या वायद्यांवर बंदी घालण्यात आल्यामुळे एनसीडेक्सची डिसेंबरमधील उलाढाल १२ टक्क्याने घटलीय.
Agri commodity futures ban takes toll on NCDEX
Agri commodity futures ban takes toll on NCDEX

केंद्र सरकारने सात कमोडिटीजच्या वायद्यांवर बंदी घातल्यामुळे नॅशनल कमोडिटीज अँड डेरिव्हेटिव्ज एक्स्चेंजची ((NCDEX) उलाढाल फेब्रुवारी महिन्यात  १९ टक्क्यांनी घटून २४,९८० कोटींवर आली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत एनसीडेक्सची उलाढाल ३०,८०० कोटी रुपयांवर होती. बिझनेस लाईन यासंदर्भातील वृत्त दिलंय. 

एनसीडेक्सच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार , केंद्र सरकारकडून बिगर बासमती, गहू, तांदूळ, चना, मोहरी, मोहरी तेल व पेंड सोयाबीन आणि इतर घटक, मूग आणि कच्चा पाम तेल या कमोडिटीजच्या वायद्यांवर बंदी घालण्यात आल्यामुळे एनसीडेक्सची डिसेंबरमधील उलाढाल १२ टक्क्याने घटलीय.

व्हिडीओ पहा-    डिसेंबरमध्ये एनसीडेक्सची उलाढाल ३०२४३ कोटी रुपयांवर होती. जानेवारीत एनसीडेक्सची उलाढाल २६४७७ कोटींवर आलीय. 

केंद्र सरकारच्या अचानकपणे सात कमोडिटीजच्या वायद्यांवर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे बाजारात एक नकारात्मक वातावरण निर्माण झाले ज्याचा फटका कृषी उत्पादनांच्या व्यवहारात आघाडीवर असलेल्या एनसीडेक्सच्या उलाढालीवर झाला असल्याची प्रतिक्रिया आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सचे संचालक नवीन माथूर यांनी दिलीय. 

वायद्यांवर बंदी घालून दोन महिने उलटून गेले तरीही अद्याप गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक वातावरण काय आहे. एकदा गुंतवणूकदारांनी एखाद्या कमोडिटीजमधील गुंतवणुकीकडे पाठ फिरवली की त्यांना पुन्हा गुंतवणुकीस प्रवृत्त करायला वेळ लागत असल्याचे राठी म्हणालेत.  

सरकारच्या या निर्णयाचा फटका बसल्याने एनसीडेक्सच्या व्यापाराचे प्रमाण ३७ टक्क्यांनी मंदावले आहे,  फेब्रुवारीत एनसीडेक्सचा व्यापार ३६.५७ लाख होता. गेल्यावर्षी फेब्रुवारीत ५७.८१ लाखांचा व्यापार झाला होता.  डिसेंबर महिन्यातील एमसीएक्सच्या (MCX) उलाढालीत ६ टक्क्यांची घट झाली असून ही उलाढाल ६,३७,९०८ कोटींवर गेलीय. जानेवारीत ही उलाढाल ६,६४,४४४ कोटी तर फेब्रुवारीत ८,२१,९९५ कोटींवर होती. सोने, ऊर्जा आणि इतर धातूंच्या वाढत्या किमतीमुळे एमसीएक्सच्या उलाढालीत झालेली घट लवकर भरून निघालीय. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com