कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची चिंता

मुंबई : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२ लाख टन साखर शिल्लक असताना यंदा उसाचे बंपर पीक उभे आहे. त्यामुळे राज्यात साखरेचा मोठा साठा निर्माण होणार असून कारखाने अडचणीत येणार आहेत. यावर काही उपाययोजना करावी, असे साकडे साखर कारखानदारांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना घातले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२ लाख टन साखर शिल्लक असताना यंदा उसाचे बंपर पीक उभे आहे. त्यामुळे राज्यात साखरेचा मोठा साठा निर्माण होणार असून कारखाने अडचणीत येणार आहेत. यावर काही उपाययोजना करावी, असे साकडे साखर कारखानदारांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना घातले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघामध्ये सोमवारी (ता.२८) एक अनौपचारिक बैठक झाली. त्यामध्ये साखर संघाकडून शरद पवार यांच्याकडे साखर कारखान्यांच्या समस्या मांडण्यात आल्या.

यासंदर्भात माहिती देताना संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे म्हणाले की, यंदा राज्यात ९०० लाख टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे. मागच्या हंगामातील ७२ लाख टन साखर शिल्लक आहे. त्यात यंदाच्या १०० लाख टन साखरेची भर पडणार आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने पुढच्या हंगामात अधिक ऊस असणार आहे. वाढत्या साखर साठ्याची मोठी समस्या राज्यात उद्भवली आहे. यावर मार्ग काढावा, अशी मागणी आम्ही श्री. पवार यांच्याकडे केली.

पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे २ ऑक्टोबरला बैठक आहे. त्यात साखर साठ्यावर मार्ग काढण्यासंदर्भात काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. सोमवारी पवार यांच्या हस्ते साखर संघात नव्याने बनवण्यात आलेल्या बँक्वेट हॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, कार्यकारी संचालक संजय खताळ आदी उपस्थित होते.

‘१५ ऑक्टोबरपासून गाळप’ १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरु होत आहे. किमान १९५ कारखाने चालू हाणे आवश्यक आहे. तसेच यंदा गाळप घटविण्याची गरज असून इथेनॉल निर्मितीला अधिक चालना दिली पाहिजे, अशी विनंती पवार यांच्याकडे केल्याचे शेटे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com