Agri Industry News Manufacturers worry about rising sugar stocks Pune Maharashtra | Agrowon

कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची चिंता

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२ लाख टन साखर शिल्लक असताना यंदा उसाचे बंपर पीक उभे आहे. त्यामुळे राज्यात साखरेचा मोठा साठा निर्माण होणार असून कारखाने अडचणीत येणार आहेत. यावर काही उपाययोजना करावी, असे साकडे साखर कारखानदारांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना घातले आहे.

मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२ लाख टन साखर शिल्लक असताना यंदा उसाचे बंपर पीक उभे आहे. त्यामुळे राज्यात साखरेचा मोठा साठा निर्माण होणार असून कारखाने अडचणीत येणार आहेत. यावर काही उपाययोजना करावी, असे साकडे साखर कारखानदारांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना घातले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघामध्ये सोमवारी (ता.२८) एक अनौपचारिक बैठक झाली. त्यामध्ये साखर संघाकडून शरद पवार यांच्याकडे साखर कारखान्यांच्या समस्या मांडण्यात आल्या.

यासंदर्भात माहिती देताना संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे म्हणाले की, यंदा राज्यात ९०० लाख टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे. मागच्या हंगामातील ७२ लाख टन साखर शिल्लक आहे. त्यात यंदाच्या १०० लाख टन साखरेची भर पडणार आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने पुढच्या हंगामात अधिक ऊस असणार आहे. वाढत्या साखर साठ्याची मोठी समस्या राज्यात उद्भवली आहे. यावर मार्ग काढावा, अशी मागणी आम्ही श्री. पवार यांच्याकडे केली.

पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे २ ऑक्टोबरला बैठक आहे. त्यात साखर साठ्यावर मार्ग काढण्यासंदर्भात काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. सोमवारी पवार यांच्या हस्ते साखर संघात नव्याने बनवण्यात आलेल्या बँक्वेट हॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, कार्यकारी संचालक संजय खताळ आदी उपस्थित होते.

‘१५ ऑक्टोबरपासून गाळप’
१५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरु होत आहे. किमान १९५ कारखाने चालू हाणे आवश्यक आहे. तसेच यंदा गाळप घटविण्याची गरज असून इथेनॉल निर्मितीला अधिक चालना दिली पाहिजे, अशी विनंती पवार यांच्याकडे केल्याचे शेटे यांनी सांगितले.


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...