Agri Industry News Uttar Pradesh will be on the top in sugar production maharashtra | Agrowon

साखर उत्पादनात उत्तरप्रदेशच राहणार आघाडीवर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 डिसेंबर 2019

कोल्हापूर : यंदाच्या गाळप हंगामात साखर उत्पादनात उत्तरप्रदेशच आघाडीवर राहण्याची शक्‍यता आहे. देशात नोव्हेंबर अखेर १८.८५ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यापैकी एकट्या उत्तरप्रदेशातच १० लाख टन साखरनिर्मिती झाल्याचे ‘इस्मा’ने म्हणले आहे.

कोल्हापूर : यंदाच्या गाळप हंगामात साखर उत्पादनात उत्तरप्रदेशच आघाडीवर राहण्याची शक्‍यता आहे. देशात नोव्हेंबर अखेर १८.८५ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यापैकी एकट्या उत्तरप्रदेशातच १० लाख टन साखरनिर्मिती झाल्याचे ‘इस्मा’ने म्हणले आहे.

साखर उत्पादनाच्या बाबतीत प्रत्येक वर्षी उत्तरप्रदेशाला टक्कर देणाऱ्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांत यंदा उसाच्या बाबतीत प्रतिकूल स्थिती आहे. यामुळे यंदा देशाच्या साखर उत्पादनात उत्तर प्रदेशच नंबर वन राहील असा अंदाज आहे. देशातील साखर हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. नोव्हेंबर अखेरच्या कालावधीपर्यंत साखर उत्पादनात उत्तरप्रदेशच आघाडीवर असल्याचे चित्र आहे. या कालावधीत उत्तरप्रदेशातील १११ कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता.

या कारखान्यांनी १०.८१ लाख टन साखर उत्पादित केली. गेल्यावर्षीच्या या कालावधीतील आकडेवारीवरील नजर टाकल्यास उत्तरप्रदेशचे साखर उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जास्त होत असल्याचे दिसते. गेल्या वर्षी नोव्हेंबर अखेर उत्तर प्रदेशातील १०५ साखर कारखाने सुरू होते. त्यांनी ९.१४ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते.

पूरबाधित उसाच्या गाळपामुळे महाराष्ट्रात साखर उत्पादनावर परिणाम
महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांत सध्या पूरबाधित उसाचे गाळप सुरू आहे. साठ टक्के चांगला चाळीस टक्के पूरबाधित असे ऊस गाळप करुन कारखान्यांनी साखर उतारा घटणार नाही याची काळजी घेण्यास सुरवात केली आहे. पण अनेक ठिकाणी पूरबाधित नसलेल्या उसाची प्रतही खराब झाल्याने उताऱ्यात घट येत आहे. याचा परिणाम साखर उत्पादनावर होत आहे.

यामुळे गेल्या तीन आठवड्यांमध्ये एकूण क्षेत्राच्या केवळ दहा ते पंधरा टक्के उसाची तोडणीच कारखान्यांकडून झाली आहे. अजूनही पूरबाधित ऊस लवकर तोडण्याचा दबाव कारखान्यांपुढे असल्याने महाराष्ट्रात जानेवारी व फेब्रुवारी हे दोन महिने जादा ऊस गाळपाचे राहतील, असा अंदाज कारखाना सूत्रांनी व्यक्त केला आहे. पूर्णपणे चांगला ऊस जानेवारीनंतरच गाळप होणार आहे. या वेळी सध्यापेक्षा साखर उत्पादन गती घेईल पण एकूण उत्पादन कमीच असेल असे कारखाना सूत्रांनी सांगितले.
 
महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरातची पिछाडी कायम
महाष्ट्रात यंदा उत्तरप्रदेशाच्या बरोबर उलटी स्थिती आहे. नोव्हेंबर अखेर महाराष्ट्रातील केवळ ४४ कारखान्यांनी हंगाम सुरू केला. गेल्या वर्षी नोव्हेंबर अखेर १७५ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिल्या दोन महिन्यांत केवळ एक तृतीयांश साखर कारखान्यांना हंगाम सुरू करता आला आहे. कर्नाटकातही गेल्या वर्षीच्या तुलनेत २ लाख टनांनी साखर उत्पादन घटले. गुजरातमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वीस दिवसांनी हंगाम उशिरा सुरू झाला आहे. अतिवृष्टीमुळे हंगाम वेळेत सुरू झाला नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत गुजरातमध्ये अडीच लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा केवळ ७५,००० टन साखरेचे उत्पादन झाले.
 


इतर अॅग्रोमनी
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...
काश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...
देशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...
‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...
भारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...
सांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...
शेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
ब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...
साखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...
पुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...
आगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...
साखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...
देशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर  : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...