agriclture news in marath,Cloudy weather prevails in Khandesh again | Agrowon

खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 डिसेंबर 2021

जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण पुन्हा तयार झाले आहे. यामुळे थंडी गायब झाली असून, कांदा, वेचणीवरील कापसाचे नुकसान होण्याची भीती आहे.

जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण पुन्हा तयार झाले आहे. यामुळे थंडी गायब झाली असून, कांदा, वेचणीवरील कापसाचे नुकसान होण्याची भीती आहे. कापसाची खेडा खरेदीदेखील थांबली आहे. गेले अनेक दिवस निरभ्र वातावरण नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता कायम आहे. 

नोव्हेंबरमध्ये १८ तारखेला मध्यरात्रीनंतर खानदेशात अनेक भागात पाऊस झाला. यानंतर ढगाळ व पावसाळी वातावरण कायम झाले. दोन आठवडे ढगाळ वातावरण होते. यामुळे रब्बीतील पिकांना फटका बसला. कारण थंडीच नाही. नंतर २१ नोव्हेंबरला रात्रीदेखील अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. जळगावमध्ये चोपडा, धरणगाव, जळगाव, एरंडोल, पाचोरा आदी भागात मध्यम पाऊस झाला. धुळ्यातही धुळे, शिरपूर भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. गारपीट व अतिवृष्टी कुठेही झालेली नाही. पण या पावसाने रब्बीतील पिकांची पेरणी, केळीची काढणी, शेतात पडून असलेल्या चाऱ्याची वाहतूक रखडली आहे. नोव्हेंबरमध्ये फक्त २६ ते २८ असे तीन दिवस कोरडे वातावरण खानदेशात राहीले. नोव्हेंबरमध्ये पुन्हा २९ रोजी दुपारी ढगाळ वातावरण तयार झाले. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत (ता.६) ढगाळ वातावरण आहे. हिवाळा नावालाच आहे. पावसाळी वातावरणामुळे शेतकरी चिंतित आहेत. 

रोज सकाळपासून ढगाळ, पावसाळी वातावरण राहते. या ढगाळ वातावरणामुळे कापसाची खेडा खरेदीदेखील होत नाही. कारण ही खरेदी उघड्यावर केली जाते. कापूस ट्रकमध्ये भरून वाहतूक केली जाते. यासाठी कोरडे वातावरण हवे आहे. कांदा पिकाचेदेखील अंशतः नुकसान होत आहे. बुरशीजन्य रोग सक्रिय होऊन पुढे भाजीपाला, केळी पिकात नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 
 

 
 


इतर बातम्या
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल...वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government)...
रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा...पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने...
युपी काँग्रेसची घोषणा : कर्जमाफी, गहू-...वृत्तसेवा - उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यास...
मराठवाड्यातील पाणीसाठा ८५ टक्‍क्‍यांवर औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांमधील...
कोरोना संसर्गाच्या निदानासाठी चाचण्या...बुलडाणा : ‘‘कोरोनाची तिसरी लाट सध्या सुरू आहे. या...
ग्रामपंचायतीचे शंभर टक्के कर भरल्यास...पुणे : थकीत कर वसुलीसाठी मावळ तालुक्यातील घोणशेत...
अमरावती : पोलिस अधिकाऱ्याच्या...अमरावती ः भारतीय पोलिस सेवेत असलेल्या एका युवा...
पंढरपुरातील विकासकामे दर्जेदार व्हावीत...सोलापूर ः पंढरपुरात वारीनिमित्त लाखो भाविक येतात...
अमरावती विभागात १५ हजार हेक्‍टर पिकांचे...अमरावती ः खरिपानंतर रब्बी हंगामातील पिकांनादेखील...
कोल्हापुरातील १६, तर सांगलीतील चार...कोल्हापूर : कृषी ग्राहकांची चालू व थकीत...
जळगावमधील १७५ गावांमध्ये पाणी योजना...जळगाव : जिल्ह्यातील १७५ गावांचा पाणीप्रश्‍न...
22 तारखेला कुठे होणार पाऊस?20 तारखेला दिवसभर राज्यातले हवामान कोरडे...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
लाळ्या खुरकूत साथीमुळे मलिग्रेत चार...आजरा, जि कोल्हापूर ः मलिग्रे पंचक्रोशीत लाळ्या...
वारणा साखर कारखान्याची निवडणूक...वारणानगर जि. कोल्हापूर : येथील श्री. तात्यासाहेब...
संपादित जमिनीला वाढीव मोबदला द्या अकोला : जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत...
ज्युनिअर आर. आर पाटलांनी कवठेमहांकाळचं...सांगली - संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या...
गडचिरोलीचे हत्ती गुजरातला नेण्याचा घाटगडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...