agriclture news in marathi,‘In the Clean Survey Campaign Gram Panchayats should participate ' | Page 2 ||| Agrowon

‘स्वच्छ सर्वेक्षण अभियानात  ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा’ : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021

सोलापूर ः ‘‘जिल्ह्यातील स्वच्छतेचे गुणांकन ठरवण्यासाठी गुणात्मक व संख्यात्मक मानांकनाच्या आधारे स्वतंत्र संस्थेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ हा सर्वेक्षणाचा कार्यक्रम होणार आहे.

सोलापूर ः ‘‘जिल्ह्यातील स्वच्छतेचे गुणांकन ठरवण्यासाठी गुणात्मक व संख्यात्मक मानांकनाच्या आधारे स्वतंत्र संस्थेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ हा सर्वेक्षणाचा कार्यक्रम होणार आहे. ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. 

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यासंबंधी बैठक घेतली. बैठकीच्या प्रारंभी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी शंभरकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख उपस्थित होते. 

श्री. शंभरकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वेक्षण तीन घटकांमध्ये केले जाणार आहे. सेवाविषयक प्रगती ३५० गुण, थेट निरीक्षण ३०० व नागरिकांचा प्रतिसाद ३५० गुण असतील. किमान ३० ग्रामपंचायतीमध्ये शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, धार्मिक स्थळे, बाजाराची ठिकाणे, या ठिकाणी स्वच्छतेसंदर्भात सद्यःस्थितीची पडताळणी केली जाईल. संस्थात्मक ठिकाणांवरील स्वच्छता, १५ व्या वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेली स्वच्छतेची कामे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत केलेली कामे या बाबी विचारात घेण्यात येतील,’’ असेही ते म्हणाले.  

 
 


इतर बातम्या
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...
‘अशोक’च्या निवडणुकीत ‘लोकसेवा’ची सत्ता...नगर ः श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
नगरमध्ये सहाशे शेतकऱ्यांना मिळणार... नगर ः शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत विक्रमी पेरणीनांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे...
शेतीमाल तारण योजनेत सात बाजार समित्याऔरंगाबाद : पणन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील...
‘स्वाभिमानी’चे पीकविम्यासाठीचे ठिय्या...बुलडाणा : पीकविम्याच्या मुद्यावर चिखलीमध्ये...
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...
नगरच्या सहकारावर नागवडे, मुरकुटेंची पकडउस्मानाबाद : नगर ः जिल्ह्यात श्रीगोंदा...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणाआठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती तसेच...