केळी पीक विमा धारकांना २२ हजार ५०० रुपये परतावा मंजूर  

जळगाव ः पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत (हवामानावर आधारित) केळी पिकासाठी फक्त १३५०० रुपये परतावा प्रतिहेक्टरी मंजूर झाला होता. पण हा परतावा नियमानुसार कमी आहे, किमान ३६ हजार रुपये प्रतिहेक्टरी परतावा नियमानुसार व आदेशातील बाबी लक्षात घेऊन मिळावा, अशी मागणी शेतकरी व खासदार उन्मेष पाटील यांनी केली होती.
2,500 refund sanctioned to banana crop insurance holders
2,500 refund sanctioned to banana crop insurance holders

जळगाव ः पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत (हवामानावर आधारित) केळी पिकासाठी फक्त १३५०० रुपये परतावा प्रतिहेक्टरी मंजूर झाला होता. पण हा परतावा नियमानुसार कमी आहे, किमान ३६ हजार रुपये प्रतिहेक्टरी परतावा नियमानुसार व आदेशातील बाबी लक्षात घेऊन मिळावा, अशी मागणी शेतकरी व खासदार उन्मेष पाटील यांनी केली होती. या मागणीची दखल शासन, प्रशासनाने घेऊन भोकर (ता. जळगाव) महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार ५०० रुपये परतावा मंजूर केला आहे. 

तोकड्या परताव्याबाबत खासदार पाटील यांनी कृषी आयुक्तयाच्याकडे विविध मुद्दे उपस्थित करून माहिती एका पत्राद्वारे दिली होती. त्यात विविध महिन्यांचे तापमान व त्यानुसार मंजूर परतावा निधी, आदेशात नमूद बाबी व भोकर मंडळातील तापमानाच्या नोंदी असे मुद्दे मांडले होते. पाटील यांच्या पत्राची तत्काळ दखल घेऊन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी विमा कंपनीच्या विभागीय व्यवस्थापक यांना आदेश जारी केला आहे. त्यात भोकर महसूल मंडळातील पात्र विमाधारकांना हेक्टरी २२ हजार ५०० या परतावे द्यावेत, असे म्हटले आहे.  शासन किंवा प्रशासनाचे नवे आदेश आणि खासदार, शेतकऱ्यांचा पाठपुरावा यामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे किंवा काहीसा दिलासा मिळेल, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com