धुळे जिल्ह्यात उन्हाळी कांद्याच्या लावणीस वेग 

कापडणे, जि. धुळे : धुळे जिल्ह्यात विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी चांगली आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळा कांदा लागवडीस प्राधान्य दिले आहे. कांद्याच्या क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. तरीही कांदा रोपचे भाव उतरलेलेच आहेत.
Acceleration of summer onion planting in Dhule district
Acceleration of summer onion planting in Dhule district

कापडणे, जि. धुळे : धुळे जिल्ह्यात पावसाळ्याच्या उत्तरार्धात बऱ्यापैकी पाऊस झाला. नदी, नाले खळखळून वाहिले. धरण, तलाव व प्रकल्पांमध्ये चांगला साठा झाला. अक्कलपाडा प्रकल्प वगळता सर्वच धरणे आणि तलाव ओसंडलेत. विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी चांगली आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळा कांदा लागवडीस प्राधान्य दिले आहे. कांद्याच्या क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. तरीही कांदा रोपचे भाव उतरलेलेच आहेत.  जिल्ह्यासह खानदेशात उन्हाळा कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. साधारणतः जानेवारीत लागवडीस प्रारंभ होते. मध्यापर्यंत लागवड पूर्ण होत असते. लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात कापडणे, लामकानी, निजामपूर जैताणे परिसर कांद्याचे आगार म्हणून ओळखले जाते. शेतकरी या परिसरात कांद्याची मोठी लागवड करीत असतात. कांद्याला भाव असोत अथवा नसोत, तरीही शेतकरी कांद्याच्या लागवडीत गुंतलेले असतात. किंबहुना, कांदा लागवड करणे अन् विक्रमी उत्पादन काढणे, हा छंदच जडला आहे.  कांद्याच्या रोपालाही नाही मागणी  कांदा लागवडीस वेग आला आहे. कांदा रोपांची मागणी वाढली आहे. बरचसे शेतकरी कांदा लागवडीस प्राधान्य देण्याऐवजी कांद्याचे रोप विकून कमाई करून घेत असतात. त्या शेतकऱ्यांनी कमी पाण्यात कांद्याचे रोप तयार करून विक्रीसाठी खुले केले आहे. मात्र रोपाची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आहे. परिणामी, रोप विक्रीला अधिक भाव मिळत नसल्याचे शेतकरी महेंद्र पाटील यांनी सांगितले.  कांदा लावणीसाठी दिवसाच हवी वीज  शेतकऱ्यांनी कांदा लागवड सुरू केली आहे. त्यांच्याकडून दिवसा विजेची मागणी होत आहे. वाफे तुडुंब भरूनच कांदा लागवड होत असते. चिखलीतील लावणीच्या रोपांतून कांद्याचे उत्पादन अधिक होत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. लावणी दिवसा अधिक सोईस्कर असते. रात्रीच्या अंधारात लावणी शक्य नाही.  कांदा लागवडीसाठी पाट पद्धतीने पाणी द्यावे लागत आहे. त्यासाठी वीजपुरवठा दिवसा अधिक दिवस राहायला हवा. त्याशिवाय कांदा लागवड वेळेत व गतीने होणार नाही.  - आत्माराम बळीराम पाटील, शेतकरी, कापडणे, (जि. धुळे)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com