agriclture news in marathi Farmers back to basic purchase price | Agrowon

मेशी येथे आधारभूत खरेदी किंमतकडे शेतकऱ्यांची पाठ 

टीम अॅग्रोवन
रविवार, 14 नोव्हेंबर 2021

मेशी, ता. देवळा : आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत जिल्ह्यात विविध भरडधान्य खरेदी केंद्रांवर यंदा केवळ साडेचार हजार शेतकऱ्यांनी धान्य विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. 

मेशी, ता. देवळा : आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत जिल्ह्यात विविध भरडधान्य खरेदी केंद्रांवर यंदा केवळ साडेचार हजार शेतकऱ्यांनी धान्य विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पन्नास टक्के शेतकऱ्यांनी देखील या वर्षी खरेदी केंद्रावर नोंदणी न केल्याने या वर्षी शासकीय खरेदी अल्प प्रमाणात होण्याचे संकेत मिळत आहेत. 

शासकीय आधारभूत खरेदी योजनेतील अटी व शर्ती व आधारभूत किमतीत केंद्र शासनाने केलेली अत्यल्प वाढ यामुळेच शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातून मका, ज्वारी व बाजरी च्या आधारभूत किमतीत विक्रीसाठी १०२९८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. या वर्षी मात्र ४६६९ शेतकऱ्यांनी विक्रीसाठी स्वारस्य दाखविले आहे. त्यात मुख्य पीक असलेल्या मक्याचे बाजारातील दर पाहता आधारभूत १८७० रुपये या दरात किती शेतकरी मका विक्री करतील याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. ज्वारी व बाजरीसाठी मालेगाव व येवला तालुका वगळता या वर्षी नोंदणी झाली नाही. मालेगाव येथील खरेदी केंद्रावर १६१ शेतकऱ्यांनी ज्वारीची व ९० शेतकऱ्यांनी बाजरीची नोंदणी केली. येवल्यातही ज्वारी ६५, तर बाजरीची २४४ शेतकऱ्यांनी नोंद केली. 

मकाची आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी व देशांतर्गत कुक्कुटपालन व्यवसायाततील मागणी यामुळे मकाचे बाजारातील दर उंच राहण्याची शक्यता आहे. यामुळे मक्याच्या आधारभूत किमतीत शासनाने किमान शंभर रुपयांची तरी वाढ करायला हवी होती. परंतु मागील दाराच्या तुलनेत केवळ वीस रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा भ्रमानिरास झाला. ज्वारी व बाजरीची देखील बाजारातील आवक व मागणीचा अभ्यास केल्यास बाजरी व ज्वारीची देखील कमी प्रमाणात विक्री होणार असल्याचे जाणकरांचे मत आहे. 
 
प्रतिक्रिया..
‘‘पिकांच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याने शासनाने आधारभूत किमतीत देखील त्याप्रमाणात वाढ केली पाहिजे.आधारभूत किमतीत आत्याल्प वाढीमुळेच शेतकऱ्यांचा नोंदणीस अल्प प्रतिसाद मिळाला.’’ 
-कृष्णा जाधव, जिल्हाध्यक्ष-प्रहार शेतकरी संघटना 

‘‘शासनाकडून सूचना प्राप्त झाल्यास नोंदणीकृत शेतकऱ्यांचे धान्य खरेदीची प्रक्रिया लवकरच राबविली जाईल.’’ 
-विवेक इंगळे, व्यवस्थापक-जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, नाशिक 
 


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील तीन हजार कामे...पुणे : जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या शंभर दिवस...
जालन्यात गहु सोंगणीला सुरुवातपिंपळगाव रेणुकाई, जि. जालना : पिंपळगाव रेणुकाईसह...
बांबू प्रक्रियेसाठी कौशल्याची आवश्यकता...दापोली, जि. रत्नागिरी ः ‘‘विस्तार शिक्षण...
शेळी, मेंढीपालन व्यवसाय म्हणजे ‘एटीएम’...दोंडाईचा, जि. धुळे : कष्टकरी शेळी-मेंढीपालन...
ड्रॅगन फ्रूटची कलमे आगीत भस्मलांजा, जि. रत्नागिरी ः तालुक्यातील धुंदरे येथे डॉ...
नगर जिल्ह्यासाठी ५४० कोटी रुपयांचा निधी...नगर : नगर जिल्हा वार्षिक योजनेत २०२२-२३ या आर्थिक...
‘पोकरा’अंतर्गत ३२७ गावांसाठी १३०...औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (...
सोलापुरातील १३ साखर कारखाने ‘लाल यादी’तमाळीनगर, जि. सोलापूर ः यंदाच्या गाळप हंगामात...
जळगावात पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत रब्बी...जळगाव ः जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ दरम्यान...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
मिनी विधानसभेच्या निवडणुका मार्चमध्ये...मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील १४...
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...