शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना सुचवा ः कृषी आयुक्त

पुणे येथे बैठक
पुणे येथे बैठक

पुणे  ः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारला ज्या उपाययोजना सुचवायच्या आहेत. त्या व्यावहारिक असाव्यात. जेणेकरून त्याची अंमलबजावणी विहीत कालमर्यादेत पूर्ण करण्यास मदत होईल, असे मत कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी व्यक्त केले.  

शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न करण्याच्या दृष्टीने येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी राज्यस्तरीय परिसंवाद आयोजित करण्यासाठी पुणे कृषी महाविद्यालयात मंगळवारी (ता.३१) बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी सचिंद्र प्रताप सिंह बोलत होते.

या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप, फुलोत्पादन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद, माजी कुलगुरू श्री. वार्ष्णेय, माजी अपर मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी, कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक प्रल्हाद पोकळे, किरण कोकाटे, शरद गडाख, विजयकुमार घावटे, अनिल बनसोडे, अभय देशपांडे; तसेच सर्व विभागीय कृषी सहसंचालक, केंद्र शासनाच्या कृषी संशोधन केंद्रांचे संचालक उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा म्हणाले, की केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काही अडचणी येत आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी राज्यपातळीवर तज्ज्ञांच्या समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या समित्यांनी अडचणी सोडविण्यासाठी काही भूमिका मांडून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे करता येईल यावर चर्चा करावी. त्यानंतर त्याचा अहवाल राज्यस्तरीय समित्यांकडे पाठवावा. राज्यस्तरीय समित्यांनी त्यांची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने लवकरच पुण्यात परिषद आयोजित करण्यात येणार आहे.  

उमेशचंद्र सरंगी म्हणाले, की राज्यात फळे, भाजीपाला, फुलांचे मोठे क्षेत्र आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पादनाला चांगला दर मिळण्यासाठी प्रक्रिया उद्योगांवर भर द्यावा. याशिवाय शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांपर्यंत सर्व योजनांची माहिती पोहोचण्यासाठी व शेतकऱ्यांशी संवाद वाढविण्यासाठी विस्तार यंत्रणेवर भर द्यावा. या वेळी पल्लवी सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com