agriclture news in marathi ,Sondale's verdict of Rs 170 crore sanctioned | Agrowon

सोंडलेचा १७० कोटींचा निवाडा मंजूर

टीम अॅग्रोवन
रविवार, 14 नोव्हेंबर 2021

तापी नदीवरील २५०० कोटी रुपयांच्या सुलवाडे- जामफळ- कानोली उपसासिंचन योजनेत येणाऱ्या बुडीत क्षेत्रात सोंडले शिवरातील ४३५ गटांतील ४८८ हेक्टर क्षेत्राचा निवाडा नाशिक विभागीय आयुक्तांनी मंजूर केला आहे. 

चिमठाणे, जि. धुळे : शिंदखेडा व धुळे तालुक्यांना योगदान ठरणारी तापी नदीवरील सुमारे २५०० कोटी रुपयांची सुलवाडे- जामफळ- कानोली उपसासिंचन योजनेत येणाऱ्या बुडीत क्षेत्रात सोंडले (ता. शिंदखेडा) गावशिवरातील ४३५ गटांतील ४८८ हेक्टर क्षेत्राचा निवाडा नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नुकताच मंजूर केला आहे. 

सोंडले येथील जमीन निवाड्यामध्ये तलाठी किशोर नेरकर यांना बळी द्यावा लागला होता. मात्र वादात सापडल्याने ३ नोव्हेंबरला सुमारे १७० कोटींचा निवाडा विभागीय आयुक्त गमे यांनी मंजूर केले असून, ४३५ गटांतील लागवडी लायक ४२६.४२ हेक्टर व पोटखराब ६१.२७ हेक्टर, असे एकूण ४८७.६९ हेक्टर क्षेत्रावरील जमीन संपादित करण्यात आली आहे, अशी माहिती शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांनी दिली. 

जामफळ व कनोली उपसासिंचन योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले होते. २०२२ पर्यंत प्रकल्प पूर्ण करायचा असून, २,२०० कोटी निधीसह मंजूर झाले आहेत. एकूण दोन हजार ४६० कोटी रुपयांची योजना आहे. यापैकी २५ टक्के रक्कम शासन, तर ७५ टक्के रक्कम नाबार्डकडून मिळविली जाणार आहे. ९.२४३ टीएमसी पाणी जामफळसह नऊ तलावांत टाकले जाणार आहे. शिंदखेडा तालुक्यातील ३८ गावांतील २४ हजार ९६० हेक्टर, तर उर्वरित धुळे तालुक्यातील शंभर गावांतील ३३ हजार ३६३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्याचा एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांची सिंचनांची सोय होणार आहे .


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील तीन हजार कामे...पुणे : जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या शंभर दिवस...
जालन्यात गहु सोंगणीला सुरुवातपिंपळगाव रेणुकाई, जि. जालना : पिंपळगाव रेणुकाईसह...
बांबू प्रक्रियेसाठी कौशल्याची आवश्यकता...दापोली, जि. रत्नागिरी ः ‘‘विस्तार शिक्षण...
शेळी, मेंढीपालन व्यवसाय म्हणजे ‘एटीएम’...दोंडाईचा, जि. धुळे : कष्टकरी शेळी-मेंढीपालन...
ड्रॅगन फ्रूटची कलमे आगीत भस्मलांजा, जि. रत्नागिरी ः तालुक्यातील धुंदरे येथे डॉ...
नगर जिल्ह्यासाठी ५४० कोटी रुपयांचा निधी...नगर : नगर जिल्हा वार्षिक योजनेत २०२२-२३ या आर्थिक...
‘पोकरा’अंतर्गत ३२७ गावांसाठी १३०...औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (...
सोलापुरातील १३ साखर कारखाने ‘लाल यादी’तमाळीनगर, जि. सोलापूर ः यंदाच्या गाळप हंगामात...
जळगावात पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत रब्बी...जळगाव ः जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ दरम्यान...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
मिनी विधानसभेच्या निवडणुका मार्चमध्ये...मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील १४...
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...