agriclture news in marathi Sowing of rabi crops at 20 percentage in Khandesh | Agrowon

खानदेशात रब्बी पिकांची पेरणी २० टक्क्यांवर

टीम अॅग्रोवन
रविवार, 14 नोव्हेंबर 2021

खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी गतीने सुरू आहे. कोरडवाहू दादर ज्वारी, हरभऱ्याची पेरणी सुरूच आहे. सध्या गहू, मका पिकाची लागवड, पेरणी अनेक भागांत सुरू आहे. सुमारे २० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.

ळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी गतीने सुरू आहे. कोरडवाहू दादर ज्वारी, हरभऱ्याची पेरणी सुरूच आहे. सध्या गहू, मका पिकाची लागवड, पेरणी अनेक भागांत सुरू आहे. सुमारे २० टक्के पेरणी पूर्ण झाल्याची माहिती आहे.

खानदेशात सुमारे चार लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी होईल. हरभऱ्याची खानदेशात सुमारे सव्वा लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. यासोबत मक्याची देखील सुमारे एक लाख हेक्टरवर लागवड होईल. कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी तापी, गिरणा, पांझरा नदीकाठी अधिक आहे. सध्या कृत्रीम जलसाठाधारक शेतकरी संकरित प्रकारच्या काबुली हरभऱ्याची पेरणी करण्याचे नियोजन करीत आहेत. या हरभऱ्याची पेरणी चोपडा, रावेर, जळगाव भागात अधिक होईल. 

गव्हाची पेरणी सुमारे तीन हजार हेक्टरवर झाली आहे. मक्याची लागवड सुमारे १० हजार हेक्टरवर झाली आहे. तर हरभऱ्याची सुमारे २५  हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. अनेक शेतकरी गुलाबी बोंड अळीमुळे कापसाखालील क्षेत्र रिकामे करीत असून, त्यात गहू, मका लागवडीचे नियोजन करीत आहेत. ही पेरणी याच महिन्यात पूर्ण होईल. तसेच डिसेंबरमध्ये मका, गहू व कांदा लागवड वाढेल.

 खानदेशात कांद्याची सुमारे १२ ते १४ हजार हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे. ही लागवड डिसेंबरमध्ये होईल. पेरणीला या आठवड्यात गती येईल. सणासुदीमुळे शेतकरी, शेतमजूर शेतात फारसे कार्यरत नव्हते. फक्त सिंचन व कापूस वेचणी, पूर्वमशागत याची कामे काही प्रमाणात सुरू होती. या आठवड्यात पेरणी वाढून पेरणीचे आकडे झपाट्याने वाढतील, असाही अंदाज आहे. धुळे, जळगाव जिल्ह्यात पेरणी ११० टक्क्यांपेक्षा अधिक होईल. जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामाचे अपेक्षित क्षेत्र सव्वा लाख हेक्टर असते. परंतु यंदा ही पेरणी दोन लाख ७५ हजार हेक्टरपेक्षा अधिक असणार आहे. पुढील महिन्यात गिरणा, वाघूर, हतनूर धरणातून पिकांसाठी पाण्याचे आवर्तनही सोडले जाईल, अशी माहिती मिळाली. यामुळे रब्बी हंगाम पुढे जोर धरणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील तीन हजार कामे...पुणे : जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या शंभर दिवस...
जालन्यात गहु सोंगणीला सुरुवातपिंपळगाव रेणुकाई, जि. जालना : पिंपळगाव रेणुकाईसह...
बांबू प्रक्रियेसाठी कौशल्याची आवश्यकता...दापोली, जि. रत्नागिरी ः ‘‘विस्तार शिक्षण...
शेळी, मेंढीपालन व्यवसाय म्हणजे ‘एटीएम’...दोंडाईचा, जि. धुळे : कष्टकरी शेळी-मेंढीपालन...
ड्रॅगन फ्रूटची कलमे आगीत भस्मलांजा, जि. रत्नागिरी ः तालुक्यातील धुंदरे येथे डॉ...
नगर जिल्ह्यासाठी ५४० कोटी रुपयांचा निधी...नगर : नगर जिल्हा वार्षिक योजनेत २०२२-२३ या आर्थिक...
‘पोकरा’अंतर्गत ३२७ गावांसाठी १३०...औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (...
सोलापुरातील १३ साखर कारखाने ‘लाल यादी’तमाळीनगर, जि. सोलापूर ः यंदाच्या गाळप हंगामात...
जळगावात पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत रब्बी...जळगाव ः जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ दरम्यान...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
मिनी विधानसभेच्या निवडणुका मार्चमध्ये...मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील १४...
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...