agriclture news in marathi,15,000 objections on electoral rolls in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात मतदारयाद्यांवर १५ हजार हरकती 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021

जळगाव ः केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात १ जानेवारी २०२२ या अर्हता तारखेवर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्यात १५ हजारांहून अधिक दावे व हरकती प्राप्त झाल्या आहेत.

जळगाव ः केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात १ जानेवारी २०२२ या अर्हता तारखेवर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत १६ नोव्हेंबरला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा झाल्या. त्यात १५ हजारांहून अधिक दावे व हरकती प्राप्त झाल्या आहेत. अजून काही दावे- हरकती घ्यावयाच्या असतील, तर शनिवारी (ता. २७) व रविवारी (ता. २८) विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 

आता महापालिका, पालिका, नगर परिषद, नगरपंचायत क्षेत्रात प्रभागनिहाय मतदारयादींचे वाचन २६ नोव्हेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. प्रभागात सध्या अस्तित्वात असलेली मतदारयादी प्रभागातील सर्व नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्यांचे वय १ जानेवारी २०२२ ला १८ वर्षे पूर्ण होत आहे, तसेच ज्यांची नावे अद्याप मतदार यादीत नोंदविलेली नाहीत त्यांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात येईल. नागरिकांना मतदार यादीत आपले नाव तपासून दावे व हरकती सादर करता येतील. मृत, स्थलांतरित, दुबार, लग्न होऊन बाहेरगावी गेलेल्या महिला मतदारांची नावे वगळणीबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. 

महत्त्वाच्या व्यक्तींचे नावे होणार चिन्हांकित 
दिव्यांग, अतिमहत्त्वाच्या व्यक्‍तीची नावे मतदार यादीत चिन्हांकित करण्यात येणार आहेत. शहरी भागातील मतदारांनी प्रभागनिहाय यादी वाचनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. 


इतर बातम्या
...तर विमा कंपन्यांवर  गुन्हे दाखल...पुणे : शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे वेळेत न...
आंदोलन सुरूच राहणार : संयुक्त किसान...नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात...
राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने उघडीप दिली...
परळी थर्मलमध्ये इंधनासाठी बांबूचा वापर...लातूर ः परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात...
पेप्सिकोच्या बटाटा वाणाचे  मालकी हक्क...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः केंद्र सरकारच्या...
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
दर्जेदार कृषी विद्यापीठांत  राज्याला...पुणे ः देशातील पहिल्या २० दर्जेदार कृषी...
पुणे जिल्ह्यात १,२४५ ‘विकेल ते पिकेल’...पुणे : शेतीमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव...
पुणे जिल्ह्यात धरणांत एक टीएमसी...पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ...
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ३६८...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या...
सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे...सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार...
सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाची...सांगली ः जिल्हा बँकेत अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव...
नंदुरबार : पशुसंवर्धन विभागाच्या...नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ या...
नंदुरबार : रब्बीचे अनुदानित बियाणे...नंदुरबार : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात मका लागवड घटणार  गहू, बाजरीची...जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत....
नांदेड जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीचे...नांदेड : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी...