सोलापूर : नमामि चंद्रभागा’अंतर्गत विकासकामांसाठी ३४ कोटींच्या कामाचा प्रस्ताव तयार 

सोलापूर ः नमामि चंद्रभागा प्राधिकरणांतर्गत भीमा नदीचे पावित्र्य राखण्यासाठी राज्य शासनाने विविध विकासकामे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पंढरपूर शहरामध्ये ५२६ स्वच्छतागृहे उभी करण्यासाठी २१.७८ कोटी तर नदीकाठावरील सहा गावांसाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी बारा कोटी, असे ३३ कोटी ७८ लाख रुपयांचा आराखडा तयार केला आहे.
34 crore work proposal for development work under Namami Chandrabhaga

मुंबई येथे नुकतीच नमामि चंद्रभागा प्राधिकरणांतर्गत विविध विकासकामांना निधीची तरतूद करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक पार पडली. याबाबत तयार केलेले प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, उजनी धरण व्यवस्थापन, वन विभाग, पंढरपूर नगरपालिका, बांधकाम विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. पंढरपुरात गोपाळपूर येथे ११४,६५ एकर पंपहाउस येथे १३७, जकात नाका रोड सांगोला येथे १२५, तर आंबेडकर नगर, कॉटेज रोड व विठ्ठल नगर येथे प्रत्येकी ५० सीटची अशी एकूण ५३६ सीटची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. यासाठी २१.७८ कोटींच्या निधीची मागणी बैठकीत करण्यात आली. तसेच नदीपात्रातील पाण्याची पातळी कायम राहण्यासाठी नवीन बंधारे बांधणे, वारकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन जैविक शौचालय उभारणे, नदी घाटाचे वनीकरण व सौंदर्यीकरण करणे, यावरही या वेळी चर्चा झाली.  सात गावांत जलशुद्धीकरण केंद्रे  पंढरपूरनजीक नदीकाठावरील सात गावांतून प्रदूषित पाणी भीमा नदीत मिसळते, ते बंद करण्यासाठी गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्र बसविण्यात येणार आहे. यासाठी १२ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. प्रामुख्याने अकलूज, माळेवाडी, संग्रामनगर, यशवंतनगर, माळीनगर, गोपाळपूर व गुरसाळे या ग्रामपंचायतीत जलशुद्धीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com