agriclture news in marathi,After receiving proposals from banks under Pradhan Mantri Yojana | Agrowon

जळगाव ः प्रधानमंत्री योजनेअंतर्गत बँकांकडे प्रस्ताव पडून 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जानेवारी 2022

जळगाव ः केंद्र शासन साह्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृतसह खासगी बँकांकडे १८ प्रस्ताव पाठवूनही ते प्रलंबित ठेवल्याने जिल्हा प्रशासनाने कमालीची नाराजी व्यक्त केली आहे.

जळगाव ः केंद्र शासन साह्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृतसह खासगी बँकांकडे १८ प्रस्ताव पाठवूनही ते प्रलंबित ठेवल्याने जिल्हा प्रशासनाने कमालीची नाराजी व्यक्त केली आहे. बँकांच्या या उदासीनतेमुळे योजनेच्या लाभार्थ्यांची मोठी अडवणूक होत आहे. दरम्यान, बुधवारी (ता. १२) झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी संबंधित बँकांना प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याच्या सूचना केल्या. 

केंद्र शासन साह्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. बैठकीला जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, अग्रणी बँकेचे अध्यक्ष अरुण प्रकाश यांच्यासह राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या योजनेअंतर्गत कृषी विभागाकडे ११३ ऑनलाइन प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी जिल्हास्तरीय समितीने ४४ प्रस्तावांना मंजुरी दिली. यातील १८ प्रस्ताव संबंधित बँकांकडे पाठविण्यात आले. मात्र अद्यापही राष्ट्रीयीकृतसह खासगी बँकांनी या प्रस्तावांना मंजुरी दिली नसल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, प्रलंबित असलेल्या या १८ प्रस्तावांसंदर्भात जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत चर्चा झाली. त्यावर जिल्हाधिकारी राऊत यांनी आठवडाभरात हे प्रस्ताव मंजूर करावे, अशा सूचना केल्या. तसेच त्याबाबतचा आढावादेखील पुढील बैठकीत घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज जिल्हाधिकारी कार्यालयात बबिता जैन आणि वेणूगोपाल बिर्ला या दोन लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत अर्थसाह्याचा धनादेश जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते देण्यात आला. 

कृषी विभागाचे आवाहन 
केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेत प्रोसेसिंग युनिट करता येणार आहे. त्यासाठी जिल्हा कृषी विभागातर्फे कर्जसाह्यासाठी प्रोसेसिंग फी देखील दिली जाणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकरी व उद्योग इच्छित लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.  

 
 


इतर बातम्या
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...
‘अशोक’च्या निवडणुकीत ‘लोकसेवा’ची सत्ता...नगर ः श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
नगरमध्ये सहाशे शेतकऱ्यांना मिळणार... नगर ः शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत विक्रमी पेरणीनांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे...
शेतीमाल तारण योजनेत सात बाजार समित्याऔरंगाबाद : पणन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील...
‘स्वाभिमानी’चे पीकविम्यासाठीचे ठिय्या...बुलडाणा : पीकविम्याच्या मुद्यावर चिखलीमध्ये...
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...