agriclture news in marathi,Agriculture Minister's taluka lags behind in distribution of excess rainfall subsidy | Agrowon

कृषिमंत्र्यांच्या तालुक्याची अतिवृष्टी अनुदान वाटपात पिछाडी 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 नोव्हेंबर 2021

नाशिक: जिल्ह्यात  पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी १२० कोटी २४ लाख ७ हजार रुपये निधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांचा तालुक्यात २५ टक्के शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत आहे,

नाशिक: जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी १२० कोटी २४ लाख ७ हजार रुपये निधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचे दिवाळीपूर्वीच देण्याच्या घोषणा झाल्या. मात्र जिल्ह्यात अद्याप १६ टक्के शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झालेले नाही. त्यात कृषिमंत्री दादा भुसे यांचा तालुक्यात २५ टक्के शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (ता.१५) रोजीच्या अनुदान वाटप अहवालानुसार दिसून आले आहे. जिल्ह्यात मालेगाव यामध्ये पिछाडीवर आहे 
       

जिल्ह्यात ९ तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांचे अनुदान तहसीलदार यांच्याकडे वर्ग केला आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दिवाळीला अनुदान खात्यावर वर्ग करण्याची घोषणा झाली. मात्र काही ठिकाणी तांत्रिक अडचणी अडचणीत हे कामकाज सापडले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या(ता.१५) अखेरच्या अनुदान वाटप अहवालात देवळा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात १०० टक्के अनुदान वितरित करण्यात आले आहे. तर पेठ, सुरगाणा तालुक्यात वितरण पूर्ण होण्याच्या जवळपास आहे. येवला, नांदगाव तालुक्यात कामकाज टप्प्याटप्प्याने सुरू आहे. मात्र मालेगाव व निफाड तालुक्याची यात पिछाडी असल्याचे दिसून येत आहे. 
 
जिल्ह्यात सर्वाधिक ४२ कोटी अनुदान मालेगाव तालुक्याला प्राप्त झाले. शेतकऱ्यांना शासनाकडून तालुकास्तरावर प्राप्त झालेली मदत अधिकाऱ्यांनी दिवाळीच्या आत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून लाखांचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी,अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या. मात्र दिवाळीला १०० टक्के अनुदान बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग न झाल्याने ही घोषणा हवेतच विरली आहे. 

मालेगाव तालुक्यात कामकाजात तांत्रिक अडचणी: 
प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही शासनाची भूमिका असून जिल्ह्यातील एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येईल, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले. मात्र त्यांच्या तालुक्यात अनुदान हे शेतकऱ्यांचे बँक खाते उपलब्ध नसल्यामुळे पडून आहे. अशा वंचित शेतकऱ्यांची यादी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या फलकावर लावण्याचे निर्देशही त्यांनी यापूर्वी दिले. त्याच बरोबर ज्या शेतकऱ्यांचे जिल्हा बँकेत खाते नाहीत अशा शेतकऱ्यांना खाते उघडण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचनाही दिल्या. मात्र यात गती येईल का हे पाहणे अपेक्षित आहे.  

 


इतर ताज्या घडामोडी
अर्धापूर भागात केळीवर रोटावेटर; रोग,...नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकाऱ्यास...नाशिक : कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण...
कृषिमंत्र्यांच्या तालुक्याची अतिवृष्टी...नाशिक: जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान...
यवतमाळ : पाणंद रस्त्यांची मोहीम अर्धवटयवतमाळ : शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाणंद रस्ते अतिशय...
सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या...सोलापूर ः जिल्ह्याच्या विविध भागांतील...
सोलापूर जिल्ह्यात फळपीक विम्याचा लाभ...सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी २०...जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोंडलेचा १७० कोटींचा निवाडा मंजूरचिमठाणे, जि. धुळे : शिंदखेडा व धुळे तालुक्यांना...
जळगाव जिल्ह्यात भरडधान्य खरेदी योजनेचा...जळगाव ः जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना...
लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज...नाशिक : निफाड तालुक्यात मका व सोयाबीन काढणीचे काम...
मेशी येथे आधारभूत खरेदी किंमतकडे...मेशी, ता. देवळा : आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत...
गावकऱ्यांच्या श्रमामुळे ‘पद्मश्री’ :...नगर : ‘‘राजकारणापासून दूर राहून गावाच्या विकासावर...
‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाची १७ ला...बुलडाणा : कापूस-सोयाबीन उत्पादकांचे प्रश्‍न,...
बारावीच्या परीक्षेसाठी आजपासून अर्ज...मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च...
जर्मनीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले बर्लिन: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत...
मुंबईत गुरुवारी २८३ नवे कोरोना रुग्ण; २...मुंबई : बुधवारच्या तुलनेत मुंबईत कोविड बाधित...
चेन्नई पुन्हा जलमय; अतिवृष्टीचा जबर...चेन्नई ः तमिळनाडूवर अतिवृष्टीचे संकट घोंघावू...
मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६०...मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने...
बैलगाडा शर्यतप्रकरणी सोमवारी सुनावणी राजगुरुनगर, जि. पुणे : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात...
वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली...मंगरूळपीर, जि. वाशीम : तालुक्यातील कासोळा,...