Application process for irrigation and upsa irrigation started in Malegaon Irrigation Department
Application process for irrigation and upsa irrigation started in Malegaon Irrigation Department

मालेगांव पाटबंधारे विभागात पाटपाणी व उपसा सिंचनासाठी अर्जप्रक्रिया सुरू  

नाशिक : रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी मालेगाव पाटबंधारे विभाग कार्यकक्षेतील चणकापूर मोठा प्रकल्प तसेच हरणबारी, केळझर व नाग्यासाक्या या मध्यम प्रकल्पावरील आरक्षित पाण्याव्यतिरिक्त उपलब्ध पाण्यातून सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

नाशिक : रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी मालेगाव पाटबंधारे विभाग कार्यकक्षेतील चणकापूर मोठा प्रकल्प तसेच हरणबारी, केळझर व नाग्यासाक्या या मध्यम प्रकल्पावरील आरक्षित पाण्याव्यतिरिक्त उपलब्ध पाण्यातून सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पाटपाणी व उपसा सिंचनाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी १५ डिसेंबरपर्यंत सायंकाळी ५.३० पर्यंत जवळच्या शाखा कार्यालयात पाणी अर्ज सादर करावे, असे आवाहन मालेगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालयाने केले आहे.  मालेगांव पाटबंधारे विभाग कार्यकक्षेतील मध्यम व लघू प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्यातून सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या पाण्याचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी नमुना नं.७ चे पाणी अर्ज सादर करून रीतसर पोहोच पावती घेणे आवश्यक असून, मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पाणी आरक्षणाची मंजूरी महाराष्ट्र सिंचन कायदा १९७६ व प्रचलित नियमास अनुसरून असणार असून, यासाठी शेतकऱ्यांनी उभी पिके व चारा घेऊन शासनास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.  सातबारा उताऱ्यावर ज्यांचे नावे असेल त्याच्याच नावे पाणी अर्जास मंजुरी दिली जाणार आहे. उपसा, ठिबक, तुषार सिंचनधारकांना नियोजनानुसार पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. आरक्षणामुळे आवर्तनातमध्ये फेरबदल करावा लागल्यास, पिकाचे उत्पन्न कमी आसल्यास किंवा नुकसान झाल्यास याबाबत खात्याची कोणतीही जबाबदारी राहणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे. पाणी अर्जावर आधार कार्ड व मोबाईल नंबर टाकणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com