agriclture news in marathi,Application process for irrigation and upsa irrigation started in Malegaon Irrigation Department | Agrowon

मालेगांव पाटबंधारे विभागात पाटपाणी व उपसा सिंचनासाठी अर्जप्रक्रिया सुरू  

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 डिसेंबर 2021

नाशिक : रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी मालेगाव पाटबंधारे विभाग कार्यकक्षेतील चणकापूर मोठा प्रकल्प तसेच हरणबारी, केळझर व नाग्यासाक्या या मध्यम प्रकल्पावरील आरक्षित पाण्याव्यतिरिक्त उपलब्ध पाण्यातून सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

नाशिक : रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी मालेगाव पाटबंधारे विभाग कार्यकक्षेतील चणकापूर मोठा प्रकल्प तसेच हरणबारी, केळझर व नाग्यासाक्या या मध्यम प्रकल्पावरील आरक्षित पाण्याव्यतिरिक्त उपलब्ध पाण्यातून सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पाटपाणी व उपसा सिंचनाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी १५ डिसेंबरपर्यंत सायंकाळी ५.३० पर्यंत जवळच्या शाखा कार्यालयात पाणी अर्ज सादर करावे, असे आवाहन मालेगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालयाने केले आहे. 

मालेगांव पाटबंधारे विभाग कार्यकक्षेतील मध्यम व लघू प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्यातून सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या पाण्याचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी नमुना नं.७ चे पाणी अर्ज सादर करून रीतसर पोहोच पावती घेणे आवश्यक असून, मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पाणी आरक्षणाची मंजूरी महाराष्ट्र सिंचन कायदा १९७६ व प्रचलित नियमास अनुसरून असणार असून, यासाठी शेतकऱ्यांनी उभी पिके व चारा घेऊन शासनास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

सातबारा उताऱ्यावर ज्यांचे नावे असेल त्याच्याच नावे पाणी अर्जास मंजुरी दिली जाणार आहे. उपसा, ठिबक, तुषार सिंचनधारकांना नियोजनानुसार पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. आरक्षणामुळे आवर्तनातमध्ये फेरबदल करावा लागल्यास, पिकाचे उत्पन्न कमी आसल्यास किंवा नुकसान झाल्यास याबाबत खात्याची कोणतीही जबाबदारी राहणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे. पाणी अर्जावर आधार कार्ड व मोबाईल नंबर टाकणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. 


इतर बातम्या
‘पोकरा’अंतर्गत ३२७ गावांसाठी १३०...औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (...
जादा दराने खतांची विक्री सात...नाशिक : रब्बी हंगामात शेतकऱ्यांची खतांना मागणी...
महिलांच्या विरोधाने दारू दुकान बंद सिंदी (रेल्वे) (जि. वर्धा) : दारूबंदी असलेल्या...
सोलापुरातील १३ साखर कारखाने ‘लाल यादी’तमाळीनगर, जि. सोलापूर ः यंदाच्या गाळप हंगामात...
जळगावात पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत रब्बी...जळगाव ः जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ दरम्यान...
उजनीतील बेकायदा प्रवासी बोंटिगवर कारवाई...पुणे : उजनी जलाशयातून करमाळा तालुक्यातील एक...
दोन नगर पंचायतीच्या निवडणुकीत बुलडाणा...बुलडाणा ः जिल्ह्यात दोन नगरपंचायतींचे निकाल लागले...
पुणे जिल्ह्यातील रिंग रोडच्या...पुणे : ‘‘महाराष्ट्र (एमएसआरडीसी) हाती घेण्यात...
नगर जिल्ह्यात नगर पंचायत निवडणूकीत...नगर ः नगर जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींच्या...
भंडारा जिल्ह्यात २७ लाख क्‍विंटल धान...भंडारा ः जिल्ह्यात आधारभूत केंद्राच्या माध्यमातून...
वाळु प्रकरणात साडेसोळा लाखांचा दंड वरुड, अमरावती : उपविभागीय अधिकारी यांनी जप्त...
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल...वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government)...
रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा...पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने...
युपी काँग्रेसची घोषणा : कर्जमाफी, गहू-...वृत्तसेवा - उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यास...
मराठवाड्यातील पाणीसाठा ८५ टक्‍क्‍यांवर औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांमधील...
कोरोना संसर्गाच्या निदानासाठी चाचण्या...बुलडाणा : ‘‘कोरोनाची तिसरी लाट सध्या सुरू आहे. या...
ग्रामपंचायतीचे शंभर टक्के कर भरल्यास...पुणे : थकीत कर वसुलीसाठी मावळ तालुक्यातील घोणशेत...
अमरावती : पोलिस अधिकाऱ्याच्या...अमरावती ः भारतीय पोलिस सेवेत असलेल्या एका युवा...
पंढरपुरातील विकासकामे दर्जेदार व्हावीत...सोलापूर ः पंढरपुरात वारीनिमित्त लाखो भाविक येतात...
अमरावती विभागात १५ हजार हेक्‍टर पिकांचे...अमरावती ः खरिपानंतर रब्बी हंगामातील पिकांनादेखील...