agriclture news in marathi,Bachchu Kadu clears the office of the Water Resources Department | Agrowon

नाशिक: बच्चू कडू यांच्याकडून जलसंपदा विभागाच्या कार्यालयाची झाडाझडती 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 नोव्हेंबर 2021

नाशिक: राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नाशिक येथील जलसंपदा विभागांच्या कार्यालयांना अचानक भेटी दिल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. यावेळी काही अधिकारी गैरहजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे विभागाची अचानक भेट देत झाडाझडती घेतली.

नाशिक: राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नाशिक येथील जलसंपदा विभागांच्या कार्यालयांना अचानक भेटी दिल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. यावेळी काही अधिकारी गैरहजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे विभागाची अचानक भेट देत झाडाझडती घेतली.  
राज्यमंत्री बच्चू कडू हे मंगळवार(ता.२३) नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांचा ताफा नाशिक सिंचन विभाग कार्यालय गाठले. राज्यमंत्र्यांचा ताफा पाहताच अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. यावेळी अधिकाऱ्यांच्या दालनात येऊन हजेरी पुस्तक चाळले. काही कर्मचारी अनुपस्थित आहेत. याची खातरजमा करत यावेळी काही अधिकारी गैरहजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे जलसंपदा विभागाचा कारभार पुन्हा या भेटीने चव्हाट्यावर आला आहे. 

या भेटीत त्यांना विभागाची अनेक कामे प्रलंबित असल्याचं निष्पन्न झाले. माहितीच्या अधिकाराची संपूर्ण माहिती कार्यालयात लावण्यात आलेली नसल्याचे कडू यांच्या निदर्शनास आले. तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि त्यांचे केलेले निरसन याबाबतही कोणतेही काम झालेले दिसत नसल्याचेही ते म्हणाले. यावर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खुलासा करण्यास सांगितले. मात्र यावेळी काही अधिकाऱ्यांना यावेळी उत्तरे देता आली नसल्याचे समोर आले. 

दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश 
कामात अनियमितता आणि हलगर्जीपणा आढळून आल्यानंतर कडू यांनी दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या दोन अधिकाऱ्यांचा दोन दिवसांचा पगार कापण्यात यावा असे निर्देशच कडू यांनी दिले आहेत. 
 


इतर बातम्या
...तर विमा कंपन्यांवर  गुन्हे दाखल...पुणे : शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे वेळेत न...
आंदोलन सुरूच राहणार : संयुक्त किसान...नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात...
राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने उघडीप दिली...
परळी थर्मलमध्ये इंधनासाठी बांबूचा वापर...लातूर ः परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात...
पेप्सिकोच्या बटाटा वाणाचे  मालकी हक्क...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः केंद्र सरकारच्या...
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
दर्जेदार कृषी विद्यापीठांत  राज्याला...पुणे ः देशातील पहिल्या २० दर्जेदार कृषी...
पुणे जिल्ह्यात १,२४५ ‘विकेल ते पिकेल’...पुणे : शेतीमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव...
पुणे जिल्ह्यात धरणांत एक टीएमसी...पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ...
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ३६८...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या...
सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे...सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार...
सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाची...सांगली ः जिल्हा बँकेत अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव...
नंदुरबार : पशुसंवर्धन विभागाच्या...नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ या...
नंदुरबार : रब्बीचे अनुदानित बियाणे...नंदुरबार : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात मका लागवड घटणार  गहू, बाजरीची...जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत....
नांदेड जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीचे...नांदेड : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी...