agriclture news in marathi,Chalisgaon, Dist. Jalgaon: Loss of lakhs due to untimely rains | Agrowon

चाळीसगाव (जि.जळगाव) : अवकाळी पावसामुळे लाखोंचे नुकसान 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 डिसेंबर 2021

चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी भागात दोन- तीन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा बऱ्याच भागातील कांदा, गहू, हरभरा व मक्याला मोठा फटका बसला आहे.

चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी भागात दोन- तीन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा बऱ्याच भागातील कांदा, गहू, हरभरा व मक्याला मोठा फटका बसला आहे. या नुकसानीचे अद्याप पंचनामे झालेले नसले तरी लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अगोदरच वेगवेगळ्या संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता, शासनाने हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत द्यावी, अशी मागणी येथील शेतकरी बचाव कृती समितीने केली आहे. 

यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीची तुटपुंजी नुकसान भरपाई दिली जात आहे. त्यातही अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींमुळे या मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. अशातच दोन- तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील बऱ्याच भागात अवकाळी पाऊस झाला. यंदा शेतकऱ्यांनी कांदा, गहू, हरभरा व मक्याची लागवड केलेली असल्याने या पिकांच्या उत्पन्नाची शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, अवकाळी पावसामुळे होत्याचे नव्हते झाल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत. यापूर्वी महिना दीड महिन्याच्या अंतरावर दोन वेळा अतिवृष्टीचा फटका पिकांना बसला होता. या नुकसानीचे पंचनामे होऊन मदत वाटप सुरू झाली असली तरी अपेक्षित मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्य शासनाने त्यांच्या वाट्याला आलेल्या नुकसान भरपाईच्या अनुदानाचा लाभ द्यायला सुरवात केली आहे. मात्र, केंद्र सरकारच्या कोट्यातील अनुदान अद्यापही बाकी असल्याने शेतकऱ्यांना या भरपाईपासून वंचित राहावे लागत आहे. 

सरसकट पंचनामे करावेत 
दरम्यान, अवकाळीच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आधी केलेली पंचनाम्याची चूक सुधारून सध्याची परिस्थिती पाहता, नुकसानीचे सरसकट पंचनामे करून प्रती हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी बचाव कृती समितीने केली आहे. 

कृषी विभागाबद्दल नाराजी 
तालुक्यातील शेतकऱ्यांना संकटाच्या काळात सहकार्य करण्याची भूमिका कृषी विभागाने घेणे गरजेचे असताना शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याचा प्रकार कृषी विभागाकडून होत आहे. येथील तालुका कृषी कार्यालयात अनेकदा अधिकारीच उपस्थित नसतात. ते बाहेरगावहून ये- जा करीत असल्याने शेतकऱ्यांना ते कधीही भेटत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या संदर्भात जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. 

अवकाळीचा पुन्हा पिकांना फटका बसल्याने शासनाने हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत दिलीच पाहिजे. त्यासाठी आम्ही आग्रही असून, या मागणीची दखल न घेतल्यास, शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही तीव्र आंदोलन करू. 
- भीमराव जाधव, शेतकरी बचाव कृती समिती, चाळीसगाव (जि.जळगाव)  

 
 


इतर बातम्या
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल...वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government)...
रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा...पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने...
युपी काँग्रेसची घोषणा : कर्जमाफी, गहू-...वृत्तसेवा - उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यास...
मराठवाड्यातील पाणीसाठा ८५ टक्‍क्‍यांवर औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांमधील...
कोरोना संसर्गाच्या निदानासाठी चाचण्या...बुलडाणा : ‘‘कोरोनाची तिसरी लाट सध्या सुरू आहे. या...
ग्रामपंचायतीचे शंभर टक्के कर भरल्यास...पुणे : थकीत कर वसुलीसाठी मावळ तालुक्यातील घोणशेत...
अमरावती : पोलिस अधिकाऱ्याच्या...अमरावती ः भारतीय पोलिस सेवेत असलेल्या एका युवा...
पंढरपुरातील विकासकामे दर्जेदार व्हावीत...सोलापूर ः पंढरपुरात वारीनिमित्त लाखो भाविक येतात...
अमरावती विभागात १५ हजार हेक्‍टर पिकांचे...अमरावती ः खरिपानंतर रब्बी हंगामातील पिकांनादेखील...
कोल्हापुरातील १६, तर सांगलीतील चार...कोल्हापूर : कृषी ग्राहकांची चालू व थकीत...
जळगावमधील १७५ गावांमध्ये पाणी योजना...जळगाव : जिल्ह्यातील १७५ गावांचा पाणीप्रश्‍न...
22 तारखेला कुठे होणार पाऊस?20 तारखेला दिवसभर राज्यातले हवामान कोरडे...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
लाळ्या खुरकूत साथीमुळे मलिग्रेत चार...आजरा, जि कोल्हापूर ः मलिग्रे पंचक्रोशीत लाळ्या...
वारणा साखर कारखान्याची निवडणूक...वारणानगर जि. कोल्हापूर : येथील श्री. तात्यासाहेब...
संपादित जमिनीला वाढीव मोबदला द्या अकोला : जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत...
ज्युनिअर आर. आर पाटलांनी कवठेमहांकाळचं...सांगली - संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या...
गडचिरोलीचे हत्ती गुजरातला नेण्याचा घाटगडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...