चिनावल, जि.जळगाव ः शेत शिवारात केबल चोरीचे प्रकार वाढले 

चिनावल, जि.जळगाव ः जिल्ह्यात रावेर, यावल, चोपडा, जळगाव, जामनेर आदी भागांत शिवारातील कृषिपंपांची यंत्रणा चोरीचे प्रकार वाढले आहेत. यामुळे कृषिपंप सुरू करणे अशक्य झाले आहे.
Chinawal, Dist. Jalgaon: Types of cable theft increased in Shet Shivara
Chinawal, Dist. Jalgaon: Types of cable theft increased in Shet Shivara

चिनावल, जि.जळगाव ः जिल्ह्यात रावेर, यावल, चोपडा, जळगाव, जामनेर आदी भागांत शिवारातील कृषिपंपांची यंत्रणा चोरीचे प्रकार वाढले आहेत. यामुळे कृषिपंप सुरू करणे अशक्य झाले आहे. शेतकरी जेरीस आले असून, नुकसानीचा सामना करावा लागत आहे. 

येथे गेल्या २० दिवसांपासून चिनावल, कुंभारखेडा, सावखेडा (ता. रावेर) परिसरात शेतकऱ्यांच्या केळी घड, पीकचोरी, पीक नुकसानी, केबल चोरीचे सत्र सुरूच असून, मंगळवारी (ता. ८) रात्री देखील चिनावल व वडगाव शिवारातून चोरट्यांनी ४ शेतकऱ्यांच्या विहिरींवरील इलेक्ट्रिक वीजपंपावरील स्टार्टर कटआउटची तोडफोड करीत केबल वायर चोरून नेल्याने शेतकरी भयभीत झाले आहे. 

चोरट्यांनी लक्ष केलेल्या या परिसरात पोलिसांचा खडा पहारा असतानाही चोरटे पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरी करीत असल्याने शेतकरी वैफल्यग्रस्त आहे. चिनावल शिवारातील हेमांगी कोल्हे यांचे शेत येथील गिरीश घनश्याम पाटील यांनी केले आहे. या शेतासह लगतच्या नीळकंठ मधुकर गारसे यांच्या शेतातील विहिरीवरील कॉपरचे केबल वायर तसेच वडगाव शिवारातील उटखेडा रस्त्यावरील शेतातील विहिरीवरून श्रीकांत सीताराम सरोदे व गोपाळ लक्ष्मण नेमाडे यांचीही केबल वायर चोरट्यांनी लांबविल्याने चिनावल परिसरात खळबळ उडाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसून शेती कामांना विलंब लागणार आहे. दरम्यान, वडगाव शिवारातील केबल चोरीबाबत वडगावसह पीक संरक्षण संस्थेमार्फत तक्रार अर्ज दिला असून, याबाबत निंभोरा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी राका पाटील व विकास कोल्हे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

याबाबत योग्य पंचनामा व फिर्याद नोंदविली जाईल व अज्ञात चोरट्यांना शोधून काढले जाईल, असे बोलताना सांगितले. या वेळी शेतकरी श्रीकांत सरोदे, गोपाळ नेमाडे, ठकसेन पाटील, पोलिस पाटील संजय वाघोदे, चिनावल पोलिस पाटील नीलेश नेमाडे, वडगाव पीक संरक्षण संस्थेचे चेअरमन गोपाळ पाटील घटनास्थळी उपस्थित होते. सर्वांनी वारंवार होणाऱ्या या घटनांचा तत्काळ बंदोबस्त करण्यासाठी एकमुखी मागणी केली तर दररोज होणाऱ्या या घटनांमधील आरोपींचा शोध घेणे पोलिसांना आव्हान ठरत आहे. जळगाव तालुक्यातही मध्यंतरी भोकर येथे २२ शेतकऱ्यांच्या केबलची चोरी शिवारातून झाली होती. पण चोरट्यांचा शोध लागलेला नाही.  

   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com