agriclture news in marathi,Crop insurance refunds will be available by the end of January | Agrowon

धरणगाव, जि. जळगाव : पीकविमा परतावे जानेवारी अखेर मिळणार 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 जानेवारी 2022

धरणगाव, जि. जळगाव : नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना लवकरच पीकविम्याची भरपाई विमा कंपनीकडून मिळणार असल्याची माहिती तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिली.

धरणगाव, जि. जळगाव : नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना लवकरच पीकविम्याची भरपाई विमा कंपनीकडून मिळणार असल्याची माहिती तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिली. याबाबत तहसीलदारांच्या दालनात विमा कंपनीचे प्रतिनिधी, कृषी अधिकारी, पदाधिकारी आणि निवडक शेतकऱ्यांची बैठक झाली. यात २८ जानेवारीपर्यंत विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. 

तहसील कार्यालयात तालुकास्तरीय पीकविमा समितीची बैठक तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी धरणगाव तालुक्यातील एकूण ७ हजार ५ शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पंचनामे झाले असून, ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अथवा ऑफलाइन तक्रारी दाखल केल्या आहेत, अशा शेतकऱ्यांचे नुकसान यादीतील नावे तपासून आयसीआयसीआय लोम्बार्ड या पीकविमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खाती २८ जानेवारीपर्यंत पीकविम्याचे पैसे जमा होणार असल्याचे पीकविमा प्रतिनिधी सागर पाटील यांनी सभेमध्ये सांगितले. तसेच तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांना मार्चअखेर रक्कम कंपनीकडे प्राप्त होताच त्यांनाही याबाबत लाभ मिळणार असल्याचे सांगितले. 

या प्रसंगी गटविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी संजय देशमुख, तालुका कृषी अधिकारी यांचे प्रतिनिधी संजय कोळी, तसेच शेतकरी प्रतिनिधी तथा पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील, सचिन पवार पंचायत समिती सदस्य मुकुंद नन्नवरे आदी उपस्थित होते.  

 
 


इतर बातम्या
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...
‘अशोक’च्या निवडणुकीत ‘लोकसेवा’ची सत्ता...नगर ः श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
नगरमध्ये सहाशे शेतकऱ्यांना मिळणार... नगर ः शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत विक्रमी पेरणीनांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे...
शेतीमाल तारण योजनेत सात बाजार समित्याऔरंगाबाद : पणन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील...
‘स्वाभिमानी’चे पीकविम्यासाठीचे ठिय्या...बुलडाणा : पीकविम्याच्या मुद्यावर चिखलीमध्ये...
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...