agriclture news in marathi,Debt repayment period for Vitthal factory in Pandharpur taluka has expired | Page 3 ||| Agrowon

पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल कारखान्याला कर्ज परतफेडीची मुदत संपली 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 नोव्हेंबर 2021

सोलापूर ः पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला कर्जपरतफेडीसाठी दिलेली ६० दिवसांची मुदत संपल्याने आता कारखान्यावर जप्तीची कारवाई अटळ मानली जात आहे.

सोलापूर ः पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला कर्जपरतफेडीसाठी दिलेली ६० दिवसांची मुदत संपल्याने आता कारखान्यावर जप्तीची कारवाई अटळ मानली जात आहे. त्यामुळे यंदा साखर कारखाना सुरू होण्याची आशा मावळली आहे. 

कारखान्याने विस्तारीकरण, सहवीज प्रकल्प, डिस्टिलरी प्रकल्प आदींसाठी कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष भारत भालके यांनी राज्य सहकारी बँकेकडून वेळोवेळी ३४१ कोटी रुपये आणि अन्य बँकांकडून सुमारे ८६ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. पण यंदा कारखान्याचा हंगाम सुरू होऊन काही तरी मार्ग निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु विद्यमान अध्यक्ष भगीरथ भालके आणि संचालक मंडळ त्यासाठी फारसे काही करू शकले नाही. त्यातच २३ सप्टेंबरला कर्जवसुलीसाठी राज्य बँकेने नोटीस बजावली होती.

त्यात ६० दिवसांची कर्जपरतफेडीची मुदत दिली होती. पण या कालावधीत कारखाना प्रशासनाकडून काहीच हालचाली होऊ शकल्या नाहीत. आता तर ही मुदत संपल्याने आणि कारखानाही सुरू न झाल्याने कारखान्यावरील जप्तीची कारवाई अटळ मानली जात आहे. ही कारवाई झाल्यास पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांबाबत अधिक दुर्दैवाची बाब मानली जात आहे. 

ताकद कमी पडली 
गेल्या दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्यातील अनेक कारखान्यांची थोड्याफार फरकाने अशीच अवस्था आहे. पण त्यात्या कारखान्याच्या संचालक मंडळ आणि प्रशासनाने मोठे प्रयत्न केले. पंढरपुरातील वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनीही राज्य बँक आणि सरकारकडे पाठपुरावा करून यंदा कारखाना सुरू केला. पण विठ्ठलचे अध्यक्ष भगीरथ भालके यांचे प्रयत्न अपुरे ठरल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मदतीसाठी प्रयत्न केले. तसेच कारखाना सुरू करण्याबाबत सूचनाही संचालक मंडळांना दिल्या. पण त्या सर्व फोल ठरल्या. मुख्यतः भालकेंची ताकद कमी पडल्याचे बोलले जाते.  

 
 


इतर बातम्या
औरंगाबादच्या ३८५ कोटींच्या प्रारूप...औरंगाबाद : कोविड, महसुलात घट आदींमुळे जिल्ह्याला...
मराठवाड्यात केशर आंबा लागवडीस वाव : डॉ...औरंगाबाद ः ‘‘केशर आंबा, लागवडीस मराठवाड्यात वाव...
खोडवा उसात पंचसूत्री महत्त्वाची : डॉ....केज, जि. बीड : ‘‘खोडवा उसाची योग्य जोपासना...
हिंगोलीचा वार्षिक योजनेचा आराखडा १७०...हिंगोली ः औरंगाबाद येथे शुक्रवारी (ता.२१) आयोजित...
सिंधुदुर्गात पशुसंवर्धनाच्या २.१९ कोटी...सिंधुदुर्गातनगरी ः विविध १६ योजनांचा समावेश...
सोलापूर: उजनीतून रब्बीसाठी एक, उन्हाळी ...सोलापूर ः उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी एक तर...
बुलडाणा: नारी शक्ती पुरस्कारासाठी ३०...बुलडाणा : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास...
सांगली जिल्हा बॅंकेचा बड्या...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बड्या...
पाणीपुरवठ्याचे थकीत देयक भरल्यास अर्धा...वाशीम ः ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा...
नांदेड जिल्ह्यात अनुदानावर भुईमुगाचे...नांदेड जिल्ह्यात : उन्हाळी हंगाम २०२१-२२ साठी...
खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू जळगाव : खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू झाला आहे...
नाशिक विभागाला ३४६ कोटींचा वाढीव निधी...नाशिक : सन २०२२-२३ साठी नाशिक विभागाला जिल्हा...
नगर विभागात ऊसगाळपात यंदाही खासगी साखर...नगर, ः नगर जिल्ह्यात यंदा सतरा सहकारी व नऊ खासगी...
नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा नागपूर ः अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यात मोठ्या...
कृषी वीजपुरवठा खंडित केल्यास तीव्र...अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील...
अचलपूर तालुक्यातील तीन कृषी...अमरावती : खत वितरणात अनियमितता निदर्शनास आल्याने...
‘जवस आर्थिक सुबत्तेचा सक्षम पर्याय’ नागपूर ः बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊनच पिकांची...
इथेनॉलच्या दरात दुजाभाव नकोधान्यापासून इथेनॉल उत्पादित करणाऱ्यांनी सरकारकडे...
'AI' च्या मदतीने कापसाचे विक्रमी...तेलंगणात या खरीप हंगामात कापसाला  (Cotton)...
दक्षिण पूर्व आशियाई देशांकडून भारतीय...दक्षिण पूर्व आशियाई देश यामध्ये प्रामुख्याने...