agriclture news in marathi,Dhule: Register participation in soybean seed production - Collector Jagdale | Page 2 ||| Agrowon

धुळे : सोयाबीन बीजोत्पादनात सहभाग नोंदवा- जिल्हाधिकारी जगदाळे

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 नोव्हेंबर 2021

धुळे : ‘‘उन्हाळी हंगाम २०२१-२२ मध्ये महाबीज सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात सहभाग नोंदवावा,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे. 

धुळे : ‘‘उन्हाळी हंगाम २०२१-२२ मध्ये महाबीज सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात सहभाग नोंदवावा,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे. 

जिल्ह्यात खरीप हंगाम-२०२१ मध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे महाबीज सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम बाधित झाला. त्यामुळे खरीप हंगाम-२०२२ मध्ये सोयाबीन बियाण्याचा तुटवडा होऊ नये यासाठी कृषी विभागाचे सचिव तथा महाबीजचे अध्यक्ष यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला (महाबीज) मार्फत धुळे जिल्ह्यात उन्हाळी हंगामात ९६० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन बियाण्याचा बीजोत्पादन कार्यक्रम राबविणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. जगदाळे यांच्या दालनात महसूल, कृषी आणि महाबीजच्या प्रमुख अधिकाऱ्यांची नियेाजन बैठक झाली. 

जिल्हाधिकारी श्री. जगदाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. बी. जोशी, उपविभागीय कृषी अधिकारी एस. डी. मालपुरे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. डी. आर. नांद्रे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी पी. एम. सोनवणे उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी श्री. जगदाळे म्हणाले, ‘‘आगामी वर्षातील खरीप हंगामाचे आतापासूनच नियोजन केल्यास सोयाबीन बियाण्याची टंचाई जाणवणार नाही. त्यामुळे बीजोत्पादनाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी.’’ 

खरेदीसाठी करार, आकर्षक दर 
महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक श्री. कोटकर यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळी हंगामात सोयाबीनचे फुले संगम, एमएयूएस-१५८,६१२ या वाणांची लागवड करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी एकरी शंभर रुपये शेतकऱ्यांनी जमा करून आरक्षण करावे. त्यासाठी महाबीजच्या कृषी अधिकारी अनिता ठाकरे व श्री. कोटकर (मो.नं.८६६९६४२७२६) यांच्याशी संपर्क साधावा. आवश्यक बियाणे लवकरच उपलब्ध होईल. बियाण्याची रक्कम भरून शेतकऱ्यांनी बियाणे उचल करावयाची आहे. एका गावात किमान १५ एकर क्षेत्रावर बीजोत्पादन कार्यक्रम होणे आवश्यक आहे. या पिकाची पेरणी डिसेंबर-२०२१ च्या शेवटचा आठवडा ते १० जानेवारी-२०२२ पर्यंत करावयाची आहे. असेही श्री. कोटकर म्हणाले. 
 


इतर बातम्या
खराब झालेल्या सोलर  पॅनेलची नुकसान...गडचिरोली : धानोरा तालुक्यातील गिरोला येथील सुरेश...
रब्बी हंगामात ज्वारी घटली; हरभऱ्याची...पुणे : राज्यात रब्बीच्या ९८ टक्के पेरा पूर्ण झाला...
डिजिटल सात-बारा प्रकल्पातून जगताप यांची...पुणेः देशात चर्चित ठरलेल्या डिजिटल सात-बारा...
बाजारात तूर आवक वाढली; दरातही सुधारणा पुणेः देशातील बाजारांमध्ये तुरीची आवक वाढली आहे....
बाजारपेठेत नव्या बेदाण्याची प्रतीक्षा सांगली ः गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याला...
पुणे जिल्ह्यातील तीन हजार कामे...पुणे : जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या शंभर दिवस...
ऊसतोडणी रखडल्याने वैभववाडी, उंबर्डेत...सिंधुदुर्गनगरी ः वैभववाडी तालुक्यातील नादुरूस्त...
साताऱ्यात कृषिपंपांची वीज तोडणीचा धडाकासातारा : गेल्या १५ दिवसांपासून ग्रामीण भागात...
वंध्यत्व निवारण शिबिरातून दूध...नागपूर : ‘‘विदर्भ व मराठवाडा दूध विकास...
नाशिकच्या स्वयंम पाटील यास प्रधानमंत्री... नाशिक: जिल्ह्यातील स्वयंम पाटील याने क्रिडा...
वीजतोडणीमुळे शेतकरी संतप्त भंडारा : निवडणुकीचे निकाल लागताच सरकारने भंडारा...
‘महाबीज’चा सोयाबीन बियाणे देण्यास नकारसांगली ः खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची कमतरता...
वीजपुरवठा सुरळीत करा; ‘बळिराजा’ची मागणीजालना : महावितरणने शेतकऱ्यांकडे थकबाकी दाखवून...
औरंगाबादमध्ये भूसंपादन मोबदल्यासाठी...औरंगाबाद : निम्न दुधना प्रकल्पाचा जलसाठा ५० टक्के...
बासमतीची निर्यात वाढण्याची शक्यता इराण आणि सौदी अरेबियाकडून होणारी बासमती तांदळाची...
राज्यात थंडीची लाट पसरणार :...पुणे : पाकिस्तान मार्गे देशाच्या पश्चिम...
गरीब कुटुंबांच्या उत्पन्नात ५३...आर्थिक उदारीकरणानंतर (Economic liberalization)...
आंबा, काजू हंगाम उशिरा सुरू होण्याचा...  वृत्तसेवा - गेल्या आठवड्याच्या शेवटी...
अन् शेतकऱ्याच्या हातात उरतं फक्त पाचटउसाला तुरा लागणं याला शेतकरी उसाचं वय झालं असं...
केंद्र सरकारकडून ६०६.१९ लाख टन...केंद्र सरकारने २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात एकूण...