agriclture news in marathi,Election in 179 gram panchayats of Raigad district | Agrowon

रायगड जिल्ह्यातील १७९ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 नोव्हेंबर 2021

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील रिक्त सदस्यपदांची निवडणूक कोरोनामुळे लांबणीवर पडली होती. अखेर या निवडणुकीला २१ डिसेंबर हा मुहूर्त मिळाला आहे. या दिवशी जिल्ह्यातील १७९ ग्रामपंचायतींच्या २८६ सदस्यांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील रिक्त सदस्यपदांची निवडणूक कोरोनामुळे लांबणीवर पडली होती. अखेर या निवडणुकीला २१ डिसेंबर हा मुहूर्त मिळाला आहे. या दिवशी जिल्ह्यातील १७९ ग्रामपंचायतींच्या २८६ सदस्यांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 

निवडणूक कार्यक्रमानुसार अलिबाग तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींमधील १२, मुरूडमधील आठ ग्रामपंचायतींतील २१, पेणमध्ये १३ ग्रामपंचायतींमधील २१, पनवेलमध्ये ५ ग्रामपंचायतींमधील ९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. उरणमधील सात सदस्यपदांसाठी, कर्जत १५, खालापूर ५, रोहा १३, सुधागड चार, माणगाव १६, तळा २०, महाड ६७, पोलादपूर २४, श्रीवर्धन ३३, म्हसळा १९ सदस्य पदांची पोटनिवडणूक होणार आहे. 

...असा आहे निवडणूक कार्यक्रम 
रिक्त ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेमध्ये नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जाची छाननी ७ डिसेंबरला ११ वाजल्यापासून होणार आहे. अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया ९ डिसेंबरला होणार असून, त्याच दिवशी दुपारी तीननंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदान २१ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान केंद्रांवर होणार आहे; तर मतमोजणी २२ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार यांनी निश्‍चित केलेल्या ठिकाणी होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

प्रशासन सज 
रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक जाहीर करण्यात आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर निवडणूक प्रशासकीय प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकीचे अर्ज स्वीकारणे, छाननी करणे, अंतिम यादी प्रसिद्ध करणे या प्रक्रिया योग्य पद्धतीने व्हाव्यात यासाठी नियोजन सुरू करण्यात आले आहे. या प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेचा भंग होणार नाही, याकडे ही लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच मतदान व मतमोजणी शांततेत व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तालुका स्तरावर सूचना करण्यात आल्या आहेत.  

 
 


इतर बातम्या
...तर विमा कंपन्यांवर  गुन्हे दाखल...पुणे : शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे वेळेत न...
आंदोलन सुरूच राहणार : संयुक्त किसान...नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात...
राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने उघडीप दिली...
परळी थर्मलमध्ये इंधनासाठी बांबूचा वापर...लातूर ः परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात...
पेप्सिकोच्या बटाटा वाणाचे  मालकी हक्क...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः केंद्र सरकारच्या...
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
दर्जेदार कृषी विद्यापीठांत  राज्याला...पुणे ः देशातील पहिल्या २० दर्जेदार कृषी...
पुणे जिल्ह्यात १,२४५ ‘विकेल ते पिकेल’...पुणे : शेतीमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव...
पुणे जिल्ह्यात धरणांत एक टीएमसी...पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ...
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ३६८...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या...
सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे...सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार...
सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाची...सांगली ः जिल्हा बँकेत अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव...
नंदुरबार : पशुसंवर्धन विभागाच्या...नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ या...
नंदुरबार : रब्बीचे अनुदानित बियाणे...नंदुरबार : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात मका लागवड घटणार  गहू, बाजरीची...जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत....
नांदेड जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीचे...नांदेड : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी...