नंदुरबारात ४५ ग्रामपंचायतीच्या ५७ जागांसाठी निवडणूक घोषित 

नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाने सदस्याचे निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतीमधील ५७ गांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
Election declared for 57 seats of 45 Gram Panchayats in Nandurbar
Election declared for 57 seats of 45 Gram Panchayats in Nandurbar

नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाने सदस्याचे निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतीमधील ५७ गांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 

नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेच्या सुधारणा सोमवार (ता. २२) पर्यंत राहील. तहसीलदार सोमवारी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करतील, नमुना ‘अ’ मध्ये नमूद ठिकाणी ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील. ७ डिसेंबरला सकाळी अकराला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. ९ डिसेंबरला दुपारी तीनपर्यंत माघारी घेता येईल. ९ डिसेंबरला दुपारी तीननंतर निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. २१ डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान होईल, तर २२ डिसेंबरला मतमोजणीचे ठिकाण व वेळ तहसीलदार निश्‍चित करतील. त्यानुसार मतमोजणी होईल. 

पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती :  अक्राणी तालुक्यातील वरेखेडी बुद्रूक, अक्कलकुवा तालुक्यातील कोवलीमाळ, खापर, शहादा तालुक्यातील पिंप्री, कमरावद, मलोणी, कर्जोत, सावळदा, लक्कडकोट, करजई, गोदीपूर, शिरुडदिगर, बुपकरी, पाडळदा बुद्रुक, सोनवल त.बो., मनरद, कोठली त. सा., कानडी त. श., श्रीखेड, सुलतानपूर, कुऱ्हावद त. सा., वर्ढे त. श., नागझिरी, उधळोद, सारंगखेडा, म्हसावद, विरपूर, तळोदा तालुक्यातील राजविहीर, मालदा, नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद, धानोरा, ओसर्ली, समशेरपूर, धामळोद, नाशिंदे, लोणखेडा, शिदगव्हाण, कोरीट, घोटाणे, नगाव, करणखेडा, बोराळा, तर नवापूर तालुक्यातील खोलविहीर, बंधारपाडा, निंबोणी.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com