जळगाव : करपात्र १५,१३३ लाभार्थी शेतकरी पीएम शेतकरी योजनेत अपात्र 

जळगाव : शेतकऱ्यांना केंद्र शासनाव्दारे मदतीपोटी शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत वार्षिक ६ हजार रुपयांचा तीन समान हप्त्यात लाभ दिला जातो. या योजनेत करपात्र उत्पन्न असणाऱ्या १५ हजार १३३ शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले आहे.
Taxable 15133 Beneficiary Farmers Ineligible in PM Farmers Scheme
Taxable 15133 Beneficiary Farmers Ineligible in PM Farmers Scheme

जळगाव : शेतकऱ्यांना केंद्र शासनाव्दारे मदतीपोटी शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत वार्षिक ६ हजार रुपयांचा तीन समान हप्त्यात लाभ दिला जातो. या योजनेत करपात्र उत्पन्न असणाऱ्या १५ हजार १३३ शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले आहे . 

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार करपात्र उत्पन्न असलेल्या शेतकरी या योजनेच्या लाभासाठी अपात्र असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा करभरणा करणारे १५ हजार १३३ शेतकरी लाभार्थी आहेत. त्यापैकी ५ हजार ८४७ करदात्या शेतकऱ्यांनी पीएम शेतकरी योजनेच्या लाभाच्या रकमेचा परतावा जिल्हा प्रशासनास केला असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. 

जिल्ह्यात ८ लाख ५० हजाराहून अधिक हेक्टरक्षेत्र पेरणीसाठी उपयुक्त असून ७ लाख ३२ हजार २८४ शेतकरी खातेदार आहेत. शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार रुपयेप्रमाणे वार्षिक समान तीन हप्त्यात सहा हजार रुपये निधी किसान सन्मान निधीतून दिला जातो. केंद्र सरकारकडून लाभाची योजना २०१९ पासून कार्यान्वित झालेली आहे. त्यानुसार जिल्ह्यात पीएम किसान योजनेंतर्गत या योजनेंतर्गत त्यापैकी सुमारे ५ लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन व्दारा पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केली आहे. यातील बहुतांश शेतकऱ्यांना नोंदणीनुसार टप्प्याटप्प्याने ९ हप्ते प्राप्त देखिल झाले असून १० व्या हप्त्याचा लाभ मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. जिल्ह्यात करपात्र उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण झाले. यात जिल्ह्यात १५ हजार १३३ शेतकरी करदाते असल्याचे केंद्र शासनाच्या निदर्शनास आले. या करदात्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभाचा परतावा देण्याच्या नोटीस जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. या नोटिशीनुसार जिल्ह्यातील १५ हजार १३३ शेतकऱ्यांपैकी ५८४७ शेतकऱ्यांनी पीएम किसान योजना लाभाच्या रकमेचा परतावा धनादेश, डी.डी नुसार भरणा केला असल्याचेही जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com