agriclture news in marathi,Election declared for 57 seats of 45 Gram Panchayats in Nandurbar | Page 2 ||| Agrowon

जळगाव : करपात्र १५,१३३ लाभार्थी शेतकरी पीएम शेतकरी योजनेत अपात्र 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 नोव्हेंबर 2021

जळगाव : शेतकऱ्यांना केंद्र शासनाव्दारे मदतीपोटी शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत वार्षिक ६ हजार रुपयांचा तीन समान हप्त्यात लाभ दिला जातो. या योजनेत करपात्र उत्पन्न असणाऱ्या १५ हजार १३३ शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले आहे. 

जळगाव : शेतकऱ्यांना केंद्र शासनाव्दारे मदतीपोटी शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत वार्षिक ६ हजार रुपयांचा तीन समान हप्त्यात लाभ दिला जातो. या योजनेत करपात्र उत्पन्न असणाऱ्या १५ हजार १३३ शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले आहे

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार करपात्र उत्पन्न असलेल्या शेतकरी या योजनेच्या लाभासाठी अपात्र असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा करभरणा करणारे १५ हजार १३३ शेतकरी लाभार्थी आहेत. त्यापैकी ५ हजार ८४७ करदात्या शेतकऱ्यांनी पीएम शेतकरी योजनेच्या लाभाच्या रकमेचा परतावा जिल्हा प्रशासनास केला असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. 

जिल्ह्यात ८ लाख ५० हजाराहून अधिक हेक्टरक्षेत्र पेरणीसाठी उपयुक्त असून ७ लाख ३२ हजार २८४ शेतकरी खातेदार आहेत. शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार रुपयेप्रमाणे वार्षिक समान तीन हप्त्यात सहा हजार रुपये निधी किसान सन्मान निधीतून दिला जातो. केंद्र सरकारकडून लाभाची योजना २०१९ पासून कार्यान्वित झालेली आहे. त्यानुसार जिल्ह्यात पीएम किसान योजनेंतर्गत या योजनेंतर्गत त्यापैकी सुमारे ५ लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन व्दारा पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केली आहे. यातील बहुतांश शेतकऱ्यांना नोंदणीनुसार टप्प्याटप्प्याने ९ हप्ते प्राप्त देखिल झाले असून १० व्या हप्त्याचा लाभ मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे.

जिल्ह्यात करपात्र उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण झाले. यात जिल्ह्यात १५ हजार १३३ शेतकरी करदाते असल्याचे केंद्र शासनाच्या निदर्शनास आले. या करदात्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभाचा परतावा देण्याच्या नोटीस जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. या नोटिशीनुसार जिल्ह्यातील १५ हजार १३३ शेतकऱ्यांपैकी ५८४७ शेतकऱ्यांनी पीएम किसान योजना लाभाच्या रकमेचा परतावा धनादेश, डी.डी नुसार भरणा केला असल्याचेही जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. 
 


इतर बातम्या
मेळघाटच्या स्ट्रॉबेरीची पर्यटकांना भुरळचिखलदरा, जि. अमरावती : महाबळेश्वरच्या धर्तीवर...
नागपूर जिल्ह्यात एक कोटी ६३ लाखांचा...नागपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने...
शेतजमिनीची कर्जे माफ करा;...कुरुंदवाड, जि. कोल्हापूर ः कर्मवीर दादासाहेब...
सांगली बाजार समितीला पुन्हा मिळाली...सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसह सात...
अकोल्याचा सर्वसाधारण योजना नियतव्यय २००...अकोलाः जिल्ह्याच्या २०२२-२३ च्या सर्वसाधारण...
जवान अन् किसान देशाचे आधारस्तंभ:छगन...नाशिक: सैनिक जसे देशाचे रक्षण करतात, तसेच...
नाशिक: श्रमदान, लोकसहभागातून तीन दुर्गम...नाशिक: जिल्ह्याच्या पश्चिम भागातील आदिवासी...
यावल/फैजपूर, जि.जळगाव : हवामानमापक...यावल/फैजपूर, जि.जळगाव : तालुक्यात डिसेंबरमध्ये...
मंगळवेढ्यात मका खरेदी केंद्र सुरु, ...सोलापूर ः मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ...
जळगाव ः बोगस पशुवैद्यकांची यादी...जळगाव ः जिल्ह्यात बोगस डॉक्टर, बोगस पॅथॅलॉजी लॅब...
Top 5 News: रशिया-युक्रेन संघर्षाचा...1. सध्या पंजाबपासून झारखंडपर्यंत हवेचा कमी दाबाचा...
मोहरीच्या वायदेवापसीची मागणी का होतेय?वायदेबंदीला विरोध वाढतो आहे. मोहरीचे वायदे पुन्हा...
देशाची मोहरी क्रांतीकडे वाटचालपुणेः खाद्यतेल आणि पेंडच्या दरातील तेजीमुळे...
उत्तर भारतात मोहरी,हरभऱ्याला अवकाळीचा...अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उत्तर भारतातील...
रब्बी पेरणीत मक्याचे वर्चस्ववृत्तसेवा - चालू रब्बी हंगामात (Rabbi Season...
कृषी ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकारचे...  कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या (drone )...
यंदाच्या हंगामात इथेनॉलचा पुरवठा...वृत्तसेवा - इंधनाच्या आयातीवरील (Fuel Import)...
मस्त्यव्यावसायिकांनी शास्त्रशुद्ध...मस्त्यव्यवसाय क्षेत्राने देशांतर्गत गरजा...
भारत ठरला काकडीचा सर्वात मोठा...पुणे - भारत जगात काकडीची (Cucumber) निर्यात (...
किमान तापमानात घट शक्य पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...