agriclture news in marathi,Extension of Government Agricultural Technical Diploma Admission | Agrowon

शासकीय कृषी तंत्रनिकेतन पदविका प्रवेशास मुदतवाढ 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021

नाशिक : राज्य शासनाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत तीन वर्षांचा इंग्रजी माध्यमाच्या सहा सत्रांचा कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेची मुदतवाढ ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्‍वनाथ शिंदे यांनी दिली. 

नाशिक : राज्य शासनाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत तीन वर्षांचा इंग्रजी माध्यमाच्या सहा सत्रांचा कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमास काष्टी (ता. मालेगाव) येथील कृषी विज्ञान संकुलात मान्यता दिली आहे. या प्रवेश प्रक्रियेची मुदतवाढ ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्‍वनाथ शिंदे यांनी दिली. 

प्रवेश अर्ज स्वीकृतीसाठी (ता. २२) नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन मुदत होती. त्यास आता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. एसएससी उत्तीर्ण असलेल्या तंत्रनिकेतन या अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांनी तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर गुणवत्तेनुसार व राखीव आरक्षणानुसार कृषी संलग्न पदवी अभ्यासक्रमात द्वितीय वर्षात थेट प्रवेश देण्यात येणार आहे.       

अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे... 
या प्रवेशाचा अर्ज महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या www.mpkv.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावरून प्रवेश माहिती पुस्तिकेची प्रत काढून अर्जातील सर्व बाबी व्यवस्थित भराव्यात. प्रवेश अर्ज प्राचार्य, कृषी तंत्रनिकेतन, मालेगाव (जि. नाशिक) कॅम्प या ठिकाणी अथवा इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी त्या त्या घटक कृषी विद्यालयाच्या प्राचार्यांकडे जमा करावेत. प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी ९४२३७८४५३५, ७९७२२७६१०६ या क्रमांकावर संपर्क साधावा.  

 
 


इतर बातम्या
...तर विमा कंपन्यांवर  गुन्हे दाखल...पुणे : शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे वेळेत न...
आंदोलन सुरूच राहणार : संयुक्त किसान...नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात...
राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने उघडीप दिली...
परळी थर्मलमध्ये इंधनासाठी बांबूचा वापर...लातूर ः परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात...
पेप्सिकोच्या बटाटा वाणाचे  मालकी हक्क...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः केंद्र सरकारच्या...
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
दर्जेदार कृषी विद्यापीठांत  राज्याला...पुणे ः देशातील पहिल्या २० दर्जेदार कृषी...
पुणे जिल्ह्यात १,२४५ ‘विकेल ते पिकेल’...पुणे : शेतीमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव...
पुणे जिल्ह्यात धरणांत एक टीएमसी...पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ...
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ३६८...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या...
सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे...सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार...
सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाची...सांगली ः जिल्हा बँकेत अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव...
नंदुरबार : पशुसंवर्धन विभागाच्या...नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ या...
नंदुरबार : रब्बीचे अनुदानित बियाणे...नंदुरबार : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात मका लागवड घटणार  गहू, बाजरीची...जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत....
नांदेड जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीचे...नांदेड : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी...