शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे - पाशाभाई पटेल

सोलापूर ः पेट्रोल-डिझेलवरील सर्व वाहने येत्या काळात बंद होणार असून, आता इथेनॉल, बायोगॅसवरील वाहनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे. अशा या इथेनॉलच्या निर्मितीसाठी बांबू अतिशय उपयुक्त आहे.
Farmers should turn to bamboo cultivation - Patel
Farmers should turn to bamboo cultivation - Patel

सोलापूर ः पेट्रोल-डिझेलवरील सर्व वाहने येत्या काळात बंद होणार असून, आता इथेनॉल, बायोगॅसवरील वाहनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे. अशा या इथेनॉलच्या निर्मितीसाठी बांबू अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणाऱ्या बांबूशेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार पाशाभाई पटेल यांनी केले.  दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील श्री स्वामी समर्थ सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे यांनी त्यांच्या शेतावर केलेल्या बांबू लागवडीची पाशाभाई पटेल, माजी सहकारमंत्री, आमदार सुभाष देशमुख आदींनी पाहणी केली. या वेळी पटेल बोलत होते. राजशेखर शिवदारे यांनी त्यांना बांबूची लागवड आणि व्यवस्थानापबाबत माहिती दिली.  श्री. पटेल म्हणाले, ‘‘आता केवळ पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने आणि बाजाराचा अभ्यास करुन शेती केल्यास फायद्याची ठरणार आहे. ऊस व अन्य फळपिकांपेक्षा बांबू शेती अतिशय फायद्याची आहे. बांबू शेतीला पाणी कमी प्रमाणात लागते. त्याचबरोबर बांबूला चांगला भाव आहे. सर्व उद्योगामध्ये बांबूचा वापर केला जातो इथेनॉल निर्मितीसाठी बांबू अतिशय उपयुक्त आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळून नफा प्राप्त करावा, असे त्यांनी सांगितले.’’  या वेळी आमदार सुभाष देशमुख यांनी बांबू लागवडीची सविस्तर माहिती जाणून घेतली. या वेळी त्यांनी शेततळ्याचीही पाहणी करून शिवदारे यांनी केलेल्या शेतीचे समाधान व्यक्त केले. या वेळी हनुमंत कुलकर्णी, प्रमोद बिराजदार, यतीन शहा, विद्याधर वळसंगे, सिलिसिद्ध कोटे, जगदेव दसाडे, विनोद बनसोडे उपस्थित होते.  बांबू लागवडीला प्रोत्साहन  बांबूची ही वाढती मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकार त्यासाठी प्रोत्साहन देत आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून त्यासाठी याोजनाही आखल्या आहेत. त्याची माहिती घ्या, बांबू लागवडीसाठी सबसिडी ही दिली जात आहे. त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होईल, असेही पटेल म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com