जळगाव बँकेच्या अध्यक्षपदासाठी  देवकर, पाटील यांची नावे चर्चेत 

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळविल्याने अध्यक्षपदासाठी गुलाबराव देवकर यांचे नाव निश्‍चित मानले जात आहे. मात्र त्याचवेळी डॉ. सतीश पाटील यांना संधी मिळण्याची शक्यताही व्यक्त होतआहे.
For the post of Chairman of Jalgaon Bank The names of Deokar and Patil are under discussion
For the post of Chairman of Jalgaon Bank The names of Deokar and Patil are under discussion

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळविल्याने अध्यक्षपदासाठी गुलाबराव देवकर यांचे नाव निश्‍चित मानले जात आहे. मात्र त्याचवेळी डॉ. सतीश पाटील यांना संधी मिळण्याची शक्यताही व्यक्त होत असून, एकनाथ खडसे यांनी निवडणुकीत यश मिळविण्यासाठी दाखविलेल्या चाणक्य नीतीमुळे ॲड. रोहिणी खडसे यांची पुन्हा वर्णी लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही.  अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांतर्फे देवकर यांचे नाव सुचविण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. देवकर यांनी पक्षाच्या आदेशाप्रमाणे लोकसभा निवडणूक लढविली, मात्र त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली नाही. मात्र जिल्हा बँक निवडणुकीत पॅनेलचे नेतृत्व केले. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्याच वेळी पारोळ्याचे माजी आमदार डॉ. पाटील यांनाही संधी मिळणार दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाच्या ऐन पडत्या काळात त्यांनी पक्षाला सावरले. भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर त्यांनी थेट टीका केली होती. त्यामुळे त्यांचेही नाव चर्चेत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील आणि संचालकपदाची हॅटट्रिक करणारे संजय पवार यांची नावेही चर्चेत आहेत.  दरम्यान, अशा पार्श्‍वभूमीवर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कालावधी ठरण्याची शक्यताही व्यक्त होत असून, प्रत्येकी अडीच वर्षांसाठी हे पद निश्‍चित केले जाऊ शकते. या बाबत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खडसे यांचा निर्णय अंतिम राहणार आहे. त्यामुळे खडसे काय निर्णय घेतात याकडेच लक्ष असणार आहे.  उपाध्यक्षपदासाठी अमोल पाटील  महाविकास आघाडीनिर्मित सहकार पॅनेलमध्ये संख्याबळात शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे त्यांच्याकडे उपाध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ असलेले आमदार चिमणराव पाटील नवव्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याचीही शक्यता आहे. परंतु त्यांनी या पूर्वी अध्यक्षपद भूषविलेले असल्याने ते उपाध्यक्षपद घेणार नाहीत, असे मानले जाते. अशावेळी दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलेले त्यांचे पुत्र अमोल पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्या शिवाय आमदार किशोर पाटील यांनी हे पद भूषविले आहे. तसेच इतर सदस्य पहिल्यांदा निवडून आले आहेत. मात्र ज्येष्ठ नेते असलेले प्रताप हरी पाटील यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. आता फक्त पहिल्या की दुसऱ्या टर्ममध्ये संधी मिळणार, या बाबत आघाडीचे नेतेच ठरविणार आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com