येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचा भल्या पहाटे वीज उपकेंद्रावर धडक मोर्चा

नाशिक : येवला तालुक्यातील कोळगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी नगरसूल वीज उपकेंद्रावर बुधवार (ता.१६) रोजी भल्या पहाटे धडक मोर्चा नेत जाब विचारला. त्यांनंतर पुन्हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र ही अडचण गेल्या एक महिन्यापासून असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
Good morning strike on power substation
Good morning strike on power substation

नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी २४ तासांपैकी फक्त आठ तास वीजपुरवठा करण्यात येत आहे. भारनियमन असल्याने शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री पिकांना पाणी देण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत आठ तासांपैकी अवघी ४ तास वीज तीही कमी दाबाने मिळत असल्याने येवला तालुक्यातील कोळगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी नगरसूल वीज उपकेंद्रावर बुधवार (ता.१६) रोजी भल्या पहाटे धडक मोर्चा नेत जाब विचारला. त्यांनंतर पुन्हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र ही अडचण गेल्या एक महिन्यापासून असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.  कोळगावसाठी ज्या फीडरवरून वीजपुरवठा करण्यात येतो. त्या फीडरवर अतिरिक्त ताण येत असल्याने कामकाज कोलमडल्याची स्थिती आहे. यावर शेतकरी संबंधित यंत्रणेकडे संपर्क करतात, मात्र त्यांना प्रतिसाद दिला जात नसल्याची ओरड आहे. वीजपुरवठा होतो तोही निम्मा वेळ त्यातच तो पूर्ण क्षमतेने होत नसल्याने वीजपंप जळण्याचे प्रमाण वाढलेले आहे. यासह रोहित्र मोठ्या प्रमाणावर बिघाड होत असल्याची स्थिती आहे. महावितरणच्या सदोष कामकाजामुळे शेतकऱ्यांना फटका बसून मोठी गैरसोय होत आहे. या वेळी येथील शेतकरी जनार्दन कमोदकर, गोकुळ सानप, चरण पैठणकर, विलास गाढे, साईनाथ शेळके, तेजस धनवटे, महेश गाढे, आदी उपस्थित होते.  या शेतकऱ्यांना नगरसूल येथील वीज उपकेंद्राच्या पॉवर ट्रान्स्फॉर्मरवरून कोळगाव व अंकाई फीडरसाठी एकाचवेळी वीजपुरवठा करण्यात येतो; त्यामुळे ताण पडून बिघाड होत असल्याचे वीज उपकेंद्राकडून फक्त चारच तास वीजपुरवठा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.  अतिरिक्त पॉवर ट्रान्स्फॉर्मर कार्यान्वित होण्याची गरज 

गेल्या एक वर्षापासून तालुक्याचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून ५ मेगावॉट क्षमतेचा पॉवरट्रान्स्फर्मार मंजूर आहे. मात्र अद्याप तो कार्यान्वित नसल्याने येथील कामकाजात अडचणी येत आहेत. त्यामुळे भुजबळ यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी कोळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.  मुख्य हंगामात वीजपुरवठा करताना अधिक ताण पडून काही प्रमाणात अडचणी येतात. सध्या एकाचवेळी कोळगाव व अंकाईच्या फीडरसाठी वीजपुरवठा करताना पॉवरट्रान्स्फॉर्मरवर लोड येऊन तो ट्रीप होतो. येथे अजून एक पॉवर ट्रान्स्फॉर्मर मंजूर आहे. पाठपुरावा करून तो चालू झाल्यासही अडचण दूर होईल. 

- धनंजय पाटील , कनिष्ठ अभियंता, वीज उपकेंद्र, नगरसुल   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com