agriclture news in marathi,Jalgaon: Guidance on Land Fertility by Agrovan and ICL Company | Agrowon

जळगावः अॅग्रोवन व आयसीएल कंपनीतर्फे जमीन सुपीकतेबाबत मार्गदर्शन 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 डिसेंबर 2021

जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त विद्यमाने चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडावद येथील उपबाजारात (ता. चोपडा, जि. जळगाव) सोमवारी (ता.६) जागतिक मृदा दिनानिमित्त विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त विद्यमाने चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडावद येथील उपबाजारात (ता. चोपडा, जि. जळगाव) सोमवारी (ता.६) जागतिक मृदा दिनानिमित्त विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रामध्ये ‘जमीन सुपीकता आणि पीक व्यवस्थापन,’ याबाबत डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे सहायक प्राचार्य नीलेश सदार व प्रा. मोनिका नाफाडे भावसार यांनी मार्गदर्शन केले. 

या वेळी आयसीएल कंपनीचे उपव्यवस्थापक पंडित नीरपने, बाजार समितीचे सभापती दिनकर देशमुख, शेतकरी के.व्ही.देशमुख, बी.के.पाटील, लोणी येथील शेतकरी नरेंद्र मधुकर पाटील, गौरव कासट, पन्नालाल पाटील, अरूण पाटील आदी उपस्थित होते. 

प्रा.सदार म्हणाले, बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी बदलले पाहिजे. पुढील दिवस शेतीचेच आहेत. त्यासाठी जमीन सुपीकतेवर काम झाले पाहिजे. जमिनीची सुपीकता म्हणजे जमिनीतील अन्नद्रव्यांचा समतोल. अन्नद्रव्ये महत्त्वाची आहेत. पण बदलते वातावरण, खते पाण्याचा अतिवापर यामुळे जमिनीची सुपीकता धोक्यात आली आहे. जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असून, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. जमिनीची धूप थांबली पाहिजे. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी पिकांची फेरपालट करावी, पिकांचे अवशेष जमिनीत गाडावेत, हिरवळीच्या खतांचा वापर करावा, रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा व व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.’’

प्रा.नाफाडे भावसार म्हणाल्या, ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी माती परीक्षण करणे आवश्यक आहे, प्राथमिक व दुय्यम मूलद्रव्यांसोबतच सूक्ष्म मूलद्रव्यांची गरज असते. त्यासाठी जीवामृत वापर करावा.’’ 
 


इतर बातम्या
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...
‘अशोक’च्या निवडणुकीत ‘लोकसेवा’ची सत्ता...नगर ः श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
नगरमध्ये सहाशे शेतकऱ्यांना मिळणार... नगर ः शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत विक्रमी पेरणीनांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे...
शेतीमाल तारण योजनेत सात बाजार समित्याऔरंगाबाद : पणन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील...
‘स्वाभिमानी’चे पीकविम्यासाठीचे ठिय्या...बुलडाणा : पीकविम्याच्या मुद्यावर चिखलीमध्ये...
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...