agriclture news in marathi,Jalgaon tops in e-crop inspection! | Page 3 ||| Agrowon

ई- पीकपाहणीत जळगाव अव्वल ! 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021

जळगाव : राज्यातील पहिल्याच ई- पीकपाहणी प्रकल्पाचा पहिला टप्पा राज्य शासनाने पूर्ण केला आहे. राज्यातील ५८ लाख शेतकऱ्यांनी ७० लाख हेक्टरवरील ३८४ पिकांची ई- पीकपाहणी केली. या पाहणीत जळगाव जिल्ह्याने राज्यात आघाडी घेत पहिला क्रमांक मिळविला आहे.

जळगाव : राज्यातील पहिल्याच ई- पीकपाहणी प्रकल्पाचा पहिला टप्पा राज्य शासनाने पूर्ण केला आहे. राज्यातील ५८ लाख शेतकऱ्यांनी ७० लाख हेक्टरवरील ३८४ पिकांची ई- पीकपाहणी केली. या पाहणीत जळगाव जिल्ह्याने राज्यात आघाडी घेत पहिला क्रमांक मिळविला आहे. जळगाव जिल्ह्यात चार लाख ८९ लाख हेक्टरवरील पिकांची ई- पीकपाहणी झाली आहे. तीन लाख ६४ हजार खातेदारांनी ई- पीकपाहणी नोंदविली आहे. 

ई- पीकपाहणी प्रकल्पात ‘माझा शेतकरी माझा सातबारा- मीच नोंदविणार माझा पीकपेरा’ अशी संकल्पना मांडण्यात आली होती. आपल्याच शेतातील पिकांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. त्यात तलाठ्यांना प्रशिक्षित करण्यात आले. त्यांनी गावोगावी जाऊन ई- पीक नोंदणीबाबत ग्रामसेवक, पोलिसपाटील, ग्रामस्थ, प्रगतिशील शेतकरी, शेतकरी, युवावर्गाला प्रशिक्षित केले. मोबाईलचा अधिकाधिक उपयोग करणाऱ्या युवक, शेतकरी यांनी टेक्नोसेव्ही होत, ई- पीकपाहणीत आपल्या पिकांची नोंदणी केली व इतरांच्या पिकांची नोंदणी करण्यास मदत केली. सोबतच महसूल कर्मचाऱ्यांनी मदत केल्याने जिल्ह्यात सर्वाधिक ई- पीकपाहणी करून नोंदणी झाली. जिल्ह्यात सर्वांत जास्त पिकांची नोंदणी कापूस पिकांची तीन लाख २७ हजार ८३ हेक्टर झाली. द्वितीय नोंदणी मका पिकांची २५ हजार १२० हेक्टर, तृतीय नोंदणी सोयाबीन पिकांची २० हजार ४४ हेक्टरवरील झाली. 

ई- पीकपाहणी संख्यात्मक अशी... 

  • एकूण ७/१२...१२ लाख १८ हजार ९२७ 
  • एकूण खातेदार संख्या...१३ लाख ६७ हजार २०३ 
  • एकूण बिनशेती खातेदार... सहा लाख ३४ हजार ९१९ 
  • एकूण शेती खातेदार... सात लाख ३२ हजार २८४ 
  • ई-पीकपाहणी नोंदणी अंतर्गत खातेदार...तीन लाख ६४ हजार ७२४ 
  •  ई-पीकपाहणीत नोंदविलेली पीकपाहणी...चार लाख ८९ हजार ६९१ हेक्टर 
  •  नोंदविलेली पीकसंख्या...३२४ 

ई- पीकपाहणीत राज्यात जळगाव जिल्ह्याने सर्वाधिक पीकपाहणीची नोंद केली आहे. याची शेतकऱ्यांचा पीकविमा, कर्ज घेताना मदत होईल. शासनालाही कृषी धोरण ठरविताना कोणत्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल आहे, हे लक्षात येईल. 
- शुभांगी भारदे, महसूल, उपजिल्हाधिकारी (जळगाव) 
 


इतर बातम्या
औरंगाबादच्या ३८५ कोटींच्या प्रारूप...औरंगाबाद : कोविड, महसुलात घट आदींमुळे जिल्ह्याला...
मराठवाड्यात केशर आंबा लागवडीस वाव : डॉ...औरंगाबाद ः ‘‘केशर आंबा, लागवडीस मराठवाड्यात वाव...
खोडवा उसात पंचसूत्री महत्त्वाची : डॉ....केज, जि. बीड : ‘‘खोडवा उसाची योग्य जोपासना...
हिंगोलीचा वार्षिक योजनेचा आराखडा १७०...हिंगोली ः औरंगाबाद येथे शुक्रवारी (ता.२१) आयोजित...
सिंधुदुर्गात पशुसंवर्धनाच्या २.१९ कोटी...सिंधुदुर्गातनगरी ः विविध १६ योजनांचा समावेश...
सोलापूर: उजनीतून रब्बीसाठी एक, उन्हाळी ...सोलापूर ः उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी एक तर...
बुलडाणा: नारी शक्ती पुरस्कारासाठी ३०...बुलडाणा : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास...
सांगली जिल्हा बॅंकेचा बड्या...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बड्या...
पाणीपुरवठ्याचे थकीत देयक भरल्यास अर्धा...वाशीम ः ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा...
नांदेड जिल्ह्यात अनुदानावर भुईमुगाचे...नांदेड जिल्ह्यात : उन्हाळी हंगाम २०२१-२२ साठी...
खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू जळगाव : खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू झाला आहे...
नाशिक विभागाला ३४६ कोटींचा वाढीव निधी...नाशिक : सन २०२२-२३ साठी नाशिक विभागाला जिल्हा...
नगर विभागात ऊसगाळपात यंदाही खासगी साखर...नगर, ः नगर जिल्ह्यात यंदा सतरा सहकारी व नऊ खासगी...
नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा नागपूर ः अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यात मोठ्या...
कृषी वीजपुरवठा खंडित केल्यास तीव्र...अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील...
अचलपूर तालुक्यातील तीन कृषी...अमरावती : खत वितरणात अनियमितता निदर्शनास आल्याने...
‘जवस आर्थिक सुबत्तेचा सक्षम पर्याय’ नागपूर ः बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊनच पिकांची...
इथेनॉलच्या दरात दुजाभाव नकोधान्यापासून इथेनॉल उत्पादित करणाऱ्यांनी सरकारकडे...
'AI' च्या मदतीने कापसाचे विक्रमी...तेलंगणात या खरीप हंगामात कापसाला  (Cotton)...
दक्षिण पूर्व आशियाई देशांकडून भारतीय...दक्षिण पूर्व आशियाई देश यामध्ये प्रामुख्याने...