सोलापूर जिल्ह्यात खरिपातील पीक  विम्यापोटी ५८ कोटी मंजूर 

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी ५८ कोटी ३९ लाख २२ हजार रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
Kharif crop 58 crore sanctioned for insurance
Kharif crop 58 crore sanctioned for insurance

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी ५८ कोटी ३९ लाख २२ हजार रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.  यंदाच्या हंगामात जिल्ह्यात १ लाख ७२ हजार हेक्टरवरील पिकांसाठी २ लाख २१ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात विमा कंपनीकडून प्रत्यक्ष ८२ हजार ६२६ शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला आहे. बार्शी तालुक्यात सर्वाधिक ६४ हजार ९३० शेतकऱ्यांना ४५ कोटी रुपये पीक विम्याची रक्कम मंजूर झाली आहे. पंढरपूर तालुक्यात एकाही शेतकऱ्यास पीक विमा मंजूर झाला नाही तर माळशिरस तालुक्यातील एका शेतकऱ्यास तर सांगोला तालुक्यात पाच शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला आहे.   

बार्शीच्या वाट्याला सर्वाधिक ४५ कोटी  अक्कलकोट तालुक्यात ८८०३ शेतकऱ्यांना ३ कोटी ७४ लाख रुपये, बार्शी तालुक्यात ६४ हजार ९३० शेतकऱ्यांना ४५ कोटी ८४ लाख रुपये, करमाळा तालुक्यात १४३ शेतकऱ्यांना ६ लाख २० हजार रुपये, माढा तालुक्यात १०६८ शेतकऱ्यांना ४४ लाख २४ हजार रुपये, माळशिरस तालुक्यात एका शेतकऱ्यास १५ हजार रुपये, मंगळवेढा तालुक्यात ११६८ शेतकऱ्यांना ९६ लाख ३७ हजार रुपये, मोहोळ तालुक्यात २०२८ शेतकऱ्यांना ३ कोटी २० लाख रुपये, सांगोला तालुक्यात ५ शेतकऱ्यांना ९९८९ रुपये, उत्तर सोलापूर तालुक्यात ३४१५ शेतकऱ्यांना ३ कोटी १८ लाख रुपये, दक्षिण सोलापूर तालुक्यात १०६५ शेतकऱ्यांना ९४ लाख २५ हजार रुपये पीक विमा मंजूर झाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com