agriclture news in marathi,Kharif crop 58 crore sanctioned for insurance | Page 2 ||| Agrowon

सोलापूर जिल्ह्यात खरिपातील पीक  विम्यापोटी ५८ कोटी मंजूर 

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 नोव्हेंबर 2021

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी ५८ कोटी ३९ लाख २२ हजार रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी ५८ कोटी ३९ लाख २२ हजार रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

यंदाच्या हंगामात जिल्ह्यात १ लाख ७२ हजार हेक्टरवरील पिकांसाठी २ लाख २१ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात विमा कंपनीकडून प्रत्यक्ष ८२ हजार ६२६ शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला आहे. बार्शी तालुक्यात सर्वाधिक ६४ हजार ९३० शेतकऱ्यांना ४५ कोटी रुपये पीक विम्याची रक्कम मंजूर झाली आहे. पंढरपूर तालुक्यात एकाही शेतकऱ्यास पीक विमा मंजूर झाला नाही तर माळशिरस तालुक्यातील एका शेतकऱ्यास तर सांगोला तालुक्यात पाच शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला आहे. 
 

बार्शीच्या वाट्याला सर्वाधिक ४५ कोटी 
अक्कलकोट तालुक्यात ८८०३ शेतकऱ्यांना ३ कोटी ७४ लाख रुपये, बार्शी तालुक्यात ६४ हजार ९३० शेतकऱ्यांना ४५ कोटी ८४ लाख रुपये, करमाळा तालुक्यात १४३ शेतकऱ्यांना ६ लाख २० हजार रुपये, माढा तालुक्यात १०६८ शेतकऱ्यांना ४४ लाख २४ हजार रुपये, माळशिरस तालुक्यात एका शेतकऱ्यास १५ हजार रुपये, मंगळवेढा तालुक्यात ११६८ शेतकऱ्यांना ९६ लाख ३७ हजार रुपये, मोहोळ तालुक्यात २०२८ शेतकऱ्यांना ३ कोटी २० लाख रुपये, सांगोला तालुक्यात ५ शेतकऱ्यांना ९९८९ रुपये, उत्तर सोलापूर तालुक्यात ३४१५ शेतकऱ्यांना ३ कोटी १८ लाख रुपये, दक्षिण सोलापूर तालुक्यात १०६५ शेतकऱ्यांना ९४ लाख २५ हजार रुपये पीक विमा मंजूर झाला. 

 


इतर बातम्या
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...
‘अशोक’च्या निवडणुकीत ‘लोकसेवा’ची सत्ता...नगर ः श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
नगरमध्ये सहाशे शेतकऱ्यांना मिळणार... नगर ः शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत विक्रमी पेरणीनांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे...
शेतीमाल तारण योजनेत सात बाजार समित्याऔरंगाबाद : पणन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील...
‘स्वाभिमानी’चे पीकविम्यासाठीचे ठिय्या...बुलडाणा : पीकविम्याच्या मुद्यावर चिखलीमध्ये...
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...
नगरच्या सहकारावर नागवडे, मुरकुटेंची पकडउस्मानाबाद : नगर ः जिल्ह्यात श्रीगोंदा...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणाआठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती तसेच...