agriclture news in marathi,Maize cultivation in Khandesh will decline Wheat, millet sowing will increase | Agrowon

खानदेशात मका लागवड घटणार  गहू, बाजरीची पेरणी वाढणार 

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 डिसेंबर 2021

जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत. लागवड सध्या रखडत आहे. यंदा सर्वत्र मिळून सुमारे ३५ हजार हेक्टरवर लागवड होईल, अशी स्थिती आहे. 

जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत. लागवड सध्या रखडत आहे. यंदा सर्वत्र मिळून सुमारे ३५ हजार हेक्टरवर लागवड होईल, अशी स्थिती आहे. 

मका दर अस्थिर आहेत. त्याला पुढे उठाव राहील की नाही, अशी समस्यादेखील आहे. कारण पुन्हा एकदा कोविड व लॉकडाउनचे संकेत मिळत आहेत. मक्याचे दर लॉकडाउनमध्ये प्रतिक्विंटल ९०० रुपये एवढेच मिळाले होते. पोल्ट्री उद्योगाला लॉकडाउनमध्ये दणका बसला होता. तसेच प्रक्रिया उद्योगही बंद होते. यामुळे मक्याला उठाव नव्हता. आता मका दरात सुधारणा झाली आहे. पण पुढे दर टिकून राहतील की नाही, याची शाश्‍वती नाही. तसेच मका पिकावर लष्करी अळी सतत येत आहे. तीन फवारण्या घ्याव्याच लागतात. यात एकरी सहा ते सात हजार रुपये खर्च वाढला आहे. यामुळे शेतकरी मका लागवड टाळतील, असे दिसत आहे. 

मक्याची लागवड गेल्या वर्षी खानदेशात सुमारे ४२ हजार हेक्टरवर झाली होती. यंदा फक्त ३५ हजार हेक्टरवर लागवड होईल, असे दिसत आहे. मक्याऐवजी गहू, बाजरी व इतर फळ, भाजी पिकांची लागवड शेतकरी करतील. मका लागवड सध्या सुरूच आहे. अनेक शेतकरी पावसाळी वातावरणामुळे लागवड करू शकलेले नाहीत. पण लागवड पुढील आठ ते १० दिवसच होईल. त्यापुढे लागवड केली जाणार नाही. यानंतर बाजरीची पेरणी सुरू होईल. जळगाव जिल्ह्यात सुमारे २५ ते २८ हजार हेक्टरवर, तर धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे १० ते ११ हजार हेक्टरवर मका लागवड होईल. जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, जामनेर, यावल या भागात लागवड अधिक होईल. धुळ्यात शिरपुरात अधिकची लागवड होऊ शकते, अशी माहिती आहे.  

 
 


इतर बातम्या
अंदाजपत्रकातून कृषी क्षेत्राला काय हवे...लवकरच २०२२-२०२३ या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रक...
कृषी तंत्रज्ञान,ॲक्वाकल्चर क्षेत्रातील...२०२२ च्या केंद्रीय अंदाजपत्रकाच्या पार्श्वभूमीवर...
Weather Alert : थंडीची लाट 'या'...देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन दिवस...
भारताच्या गहू निर्यातीची घोडदौड वेगात दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील वाढत्या...
Top 5 News: वऱ्हाडात तुरीची आवक वाढली1. देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन...
पेनटाकळी प्रकल्पबाधित गावांना तातडीने...बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून...
नवीन बोअरवेलऐवजी `फ्लशिंग’वर भर नागपूर : उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात...
ज्वारीच्या राखणीसाठी कणसाला संरक्षण नेवासे, जि. नगर : रब्बी हंगामातील ज्वारी आता...
वाशीमलाही मिळाला १५ कोटींचा वाढीव निधी वाशीम ः जिल्ह्यातील विकासकामांना निधीची गरज...
जळगाव जिल्ह्यातील १४ वाळू लिलाव गटाची...जळगाव ः जिल्ह्यात भडगाव, पाचोरा, चोपडा येथील तीन...
सोलापूर जिल्हा दूध संघाची निवडणूक ...सोलापूर ः राज्यात नावाजलेल्या सोलापूर जिल्हा...
शेतीमालाच्या विक्रीसाठी मूल्यसाखळी...सोलापूर ः शेतकरी उत्पादनात आता पुढे आहेत. त्यांना...
जळगाव : खासगी संस्था, सोसायट्यांच्या ...जळगाव : ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे...
सांगलीत पीक कर्जवाटपात बॅंकांचा हात...सांगली ः रब्बी हंगामातील पिकांची पेरणी अंतिम झाली...
‘पाच हजार १२२ कुटुंबांना परभणी...परभणी ः ‘‘‘जल जीवन मिशन’ कार्यक्रमांतर्गत...
परभणीत ३८.९१ लाखांच्या निधीची कामे...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात एकात्मिक...
क्षारपड जमीन सुधारणा संस्थांना ११.९०...कोल्हापूर : उर्जांकुर श्री दत्त पॉवर कंपनी...
उत्तर महाराष्ट्राला थंडीचा विळखा पुणे : उत्तर भारतातील गोठविणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे...
राज्यातील ५१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना...मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रजासत्ताक...
‘सीडी रेशो’ घसरलेल्या  जिल्ह्यांमध्ये...पुणे ः कर्जवाटप व ठेवीचे गुणोत्तर (सीडी रेशो)...