मालेगाव बाजार समितीत बेकायदा अडत वसुली करण्याचा प्रकार उघड 

नाशिक : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांकडून सेवाकराच्या गोंडस नावाखाली कमिशन व अडत वसूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सामाजिक कार्यकर्ते निखील पवार यांनी निदर्शनास आणून दिला याप्रकरणात बोगस व विनानावाच्या पावती पुस्तकाचा वापर करून ही फसवणूक सुरू होती.
Malegaon Bazar Samiti reveals illegal recovery
Malegaon Bazar Samiti reveals illegal recovery

नाशिक : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांकडून सेवाकराच्या गोंडस नावाखाली कमिशन व अडत वसूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सामाजिक कार्यकर्ते निखील पवार यांनी निदर्शनास आणून दिला याप्रकरणात बोगस व विनानावाच्या पावती पुस्तकाचा वापर करून ही फसवणूक सुरू होती. हा प्रकार उजेडात आल्यानंतर बाजार समिती प्रशासनावर टीका झाली. यावर गंभीर दखल घेत सेवाकर वसूल करणाऱ्या महाराष्ट्र फ्रूट कंपनीचा परवाना रद्द करीत बाजार समितीतील संबंधित अडत व्यापाऱ्याच्या गाळ्याला सील ठोकले आहे.  राज्यात कायद्याने शेतकऱ्यांकडून अडत वसुली बंद असताना येथील बाजार समितीत महाराष्ट्र फ्रूट कंपनी व्यापाऱ्याने शेतकऱ्याकडून टरबूज विक्रीतील सेवा करापोटी १९५ रुपये वसूल केले. याबाबतची पावती श्री. पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली. यानंतर बाजार समिती प्रशासनाने चौकशी केली असता महाराष्ट्र फ्रूट कंपनीची पावती असल्याचे निदर्शनास आले. यानंतर बाजार समितीचे सचिव अशोक देसले यांनी या व्यापाऱ्याला पाच दिवसांत खुलासा करून, खुलासा समाधानकारक नसल्यास परवाना निलंबित करण्याचा इशारा दिला. मात्र हा गैरप्रकार कृषिमंत्र्यांच्या तालुक्यातील व अधिपत्याखाली असलेल्या बाजार समितीत घडल्याने बाजार समिती प्रशासन व संचालक मंडळावर शेतकऱ्यांकडून टीकेची झोड उठली. यानंतर सोमवार (ता. २९)पासूनच व्यापाऱ्याचा परवाना निलंबित करून गाळा सील केल्याचे सभापती राजेंद्र जाधव व उपसभापती सुनील देवरे यांनी कळविले.  शेतकऱ्यांनी तक्रार केली तरच कारवाई     दरम्यान, यापूर्वी समिती प्रशासनाने ७ नोव्हेंबरला महाराष्ट्र फ्रूट कंपनीला पत्र देऊन अनावश्‍यक कपात करू नये असे सूचित केले होते. तरीदेखील संबंधित अडत व्यापाऱ्याकडून कपात सुरू असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. याउलट शेतकऱ्यांनी तक्रार केली तरच कारवाई केली जाते. संचालक मंडळ व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पवार यांनी केला होता  बाजार समितीत प्रत्येक मालाच्या लिलावाच्या वेळी समितीचे कर्मचारी उपस्थित असावेत. व्यापाऱ्याला तीन प्रतींत पावती पुस्तक पुरविण्याची जबाबदारी समितीची असताना असा प्रकार होणे गैर आहे. शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे.  -निखील पवार, सामाजिक कार्यकर्ते, मालेगाव   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com