agriclture news in marathi,MSEDCL's 'One Village, One Day' initiative | Agrowon

महावितरणचा ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 नोव्हेंबर 2021

सोलापूर ः महावितरणने शेतकऱ्यांच्या वीजेसंबंधी अडचणी सोडवण्यासाठी ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २४० गावात हा उपक्रम राबवण्यात आला.

सोलापूर ः महावितरणने शेतकऱ्यांच्या वीजेसंबंधी अडचणी सोडवण्यासाठी ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २४० गावात हा उपक्रम राबवण्यात आला. सध्या रब्बीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतीपंपाच्या वीज मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे हा उपक्रम चांगलाच फायदेशीर ठरला आहे. 

महावितरणचा हा उपक्रम वीज समस्यांवर चांगला उपाय ठरल्याने महावितरणकडून संपूर्ण राज्यात तो राबविला जात आहे. ज्या गावात वीज थकबाकीची वसुली जास्त आहे, त्या गावाची निवड प्राधान्याने केली जात आहे. हा उपक्रम राबवित असताना पुरेशे मनुष्यबळ, साधनसामग्री सोबत घेऊन त्या त्या गावात पूर्ण लक्ष केंद्रित केले जात आहे. पूर्ण चौकशी करून त्या गावातील विजेच्या समस्या सोडल्या जात आहेत. सध्या रब्बी हंगाम सुरु आहे. साहजिकच, पाण्याची मागणी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीही तातडीने सुटत असल्याने शेतकऱ्यांना हा उपक्रम चांगलाच फायद्याचा ठरला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २४० गावात हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. 

अशी होतायेत कामे 

  • गावातील झुकलेले, मोडलेले विद्युत खांब उभे करणे. 
  • तारांना ताण देणे, जास्त झोळ असल्याने मधोमध नवीन खांब उभा करणे, स्पेसर लावणे. 
  • रोहित्राची व वितरण पेटीची देखभाल दुरुस्तीची कामे करणे. 
  • अनधिकृत भार काढून त्यांच्यावर कारवाई करणे. 
  • नवीन कनेक्शन घेण्यास प्रवृत्त करणे. 

 


इतर बातम्या
बासमतीची निर्यात वाढण्याची शक्यता इराण आणि सौदी अरेबियाकडून होणारी बासमती तांदळाची...
राज्यात थंडीची लाट पसरणार :...पुणे : पाकिस्तान मार्गे देशाच्या पश्चिम...
गरीब कुटुंबांच्या उत्पन्नात ५३...आर्थिक उदारीकरणानंतर (Economic liberalization)...
आंबा, काजू हंगाम उशिरा सुरू होण्याचा...  वृत्तसेवा - गेल्या आठवड्याच्या शेवटी...
अन् शेतकऱ्याच्या हातात उरतं फक्त पाचटउसाला तुरा लागणं याला शेतकरी उसाचं वय झालं असं...
केंद्र सरकारकडून ६०६.१९ लाख टन...केंद्र सरकारने २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात एकूण...
खाद्यतेलातील तेजीचा  सोयाबीनला लाभ...पुणेः देशात पामतेलाची उपलब्धता कमी असल्याने...
तापमानात घट; द्राक्ष मण्यांना तडे नाशिक : रविवारी (ता.२३) रोजी सकाळपासूनच धुके आणि...
उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा...पुणे : आखाती देशातून आलेल्या धूळ वादळामुळे...
जास्त उत्पादकतेच्या कापूस  बियाण्याला...पुणेः पाकिस्तानमध्ये कापसाची उत्पादकता दिवसेंदिवस...
गुहागरमध्ये दीडशे एकरातील  आंबा, काजू...गुहागर, जि. रत्नागिरी : तालुक्यातील गिमवी देवघर...
गावरान लाल मिरचीचा यंदा ठसकानांदेड : नायगाव तालुक्यातील बरबडा येथील गावरान...
उन्हाळ्यात पाणी टंचाई कमी भासणार पुणे : पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्याने भूगर्भातील...
वाशीममध्ये दर शनिवारी  होणार हळद खरेदी...वाशीम ः हळदीचे उत्पादन घेण्यात विदर्भात आघाडीवर...
जालन्यात गहु सोंगणीला सुरुवातपिंपळगाव रेणुकाई, जि. जालना : पिंपळगाव रेणुकाईसह...
रिक्तपदांमुळे नांदेड कृषी विभाग सलाइनवरनांदेड : साडेपाच लाख खातेदार शेतकऱ्यांचा कारभार...
वीजपुरवठा खंडित केल्याशिवाय पर्याय नाही...मुंबई : राज्यातील कृषी वीज पंप ग्राहकांकडे ४१...
बुलडाणा जिल्ह्यात तेरा बाजार...खामगाव, जि. बुलडाणा ः जिल्ह्यातील तेरा कृषी...
पुणे जिल्ह्यात ७७ लाख टन उसाचे गाळपपुणे ः साखर कारखान्यांचा गाळप हंगाम मध्यावर आला...
तोडणीला उशीर होत असल्याने उसाला तुरेनगर : गत दोन वर्षात मोठ्या प्रमाणात झालेल्या...