नंदुरबार : पशुसंवर्धन विभागाच्या योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ या वर्षासाठीजिल्हास्तरीय योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी पात्र पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केले.
Nandurbar: Appeal to submit application for the scheme of Animal Husbandry Department
Nandurbar: Appeal to submit application for the scheme of Animal Husbandry Department

नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ या वर्षासाठी राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजना व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी पात्र पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.  नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गायी, म्हशीचे गट वाटप करणे, शेळी, मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीसाठी अर्थसाह्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप करणे तसेच २५ अधिक ३ तलंगा गट वाटपासाठी लाभार्थ्यांची निवड ऑनलाइन पद्धतीने करण्यात येईल. लाभार्थ्यांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालनांपैकी ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे. ती निवड करण्याची सुविधा, अर्ज व योजनांची संपूर्ण माहिती https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर तसेच अँड्रॉइड मोबाईलवर AH-MAHABMS गुगल प्ले स्टोअरवर ४ ते १८ डिसेंबर २०२१ या कालावधीत उपलब्ध करून दिली आहे. या योजनेसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.  अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कुठल्याही परिस्थितीत अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांकात बदल करू नये. योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी किंवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, तालुका लघू पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com