Nashik: Employment creation on the land of Agriculture Corporation
Nashik: Employment creation on the land of Agriculture Corporation

नाशिक : शेती महामंडळाच्या जमिनीवर रोजगारनिर्मिती 

नाशिक: शेती महामंडळाची ४ हजार एकरपेक्षा जास्त जमीन मालेगाव तालुक्यात उपलब्ध आहे. यातून ८६३ एकर जमिनीवर एमआयडीसी तयार करण्यात येत आहे.

नाशिक: शेती महामंडळाची ४ हजार एकरपेक्षा जास्त जमीन मालेगाव तालुक्यात उपलब्ध आहे. यातून ८६३ एकर जमिनीवर एमआयडीसी तयार करण्यात येत आहे. शेती महामंडळाची जमीन उपलब्ध झाल्याने अतिशय जलद गतीने या भागाचा विकास होणार आहे. येथे उद्योग समूहांनी गुंतवणूक केल्याने या एमआयडीसीच्या विकासाला चालना मिळेल. तसेच बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.         मालेगाव तालुक्यातील अजंग, रावळगाव औद्योगिक वसाहतीत राजेश्वरी सिंथेटिक प्रा.लि. व चांदणी टेक्स्टाईल इंजिनिअरिंग इंडिया प्रा.लि.मुंबई या दोन मोठे उद्योग समूहाचे प्रकल्प भूमिपूजन व प्लॉट्स हस्तांतर भुसे यांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी आयोजित उद्योजक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर निलेश आहेर, उपजिल्हाधिकारी नितीन गवळी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, कार्यकारी अभियंता जयंत बोरसे, संजय दुसाने आदीसह उद्योजक, व्यावसायिक,गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

भुसे म्हणाले, ‘‘तालुक्यातील अजंग रावळगाव येथे ८६३ एकर जमिनीचे ३४ कोटी १७ लक्ष रुपये एमआयडीसीने शेती महामंडळाला वर्ग केलेले आहेत.तसेच या अजंग, रावळगाव औद्योगिक वसाहतीत २११ उद्योजकांनी प्लॉट्स नोंदणी केली असून त्यापैकी ७५ पेक्षा जास्त उद्योजकांनी १०० टक्के रक्कम भरली आहे.नवीन उद्योगाला उभारणीसाठी रस्ते तयार करण्यात आले असून वीज, पाणी प्रकल्प आदी सुविधा लवकरच देण्यात येतील.’’  उद्योगासाठी चणकापूर आणि पुनद धरणामधून पाणी आरक्षित  या उद्योग बांधकामासाठी लागणारे पाणी चणकापूर आणि पुनद धरणामधून आरक्षित करण्यात आले आहे. वीजेच्या बाबतीत उद्योगासाठी कायमस्वरूपी लागणारी वीज देण्यासाठी स्वतंत्र सबस्टेशन निर्माण करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जास्तीत जास्त उद्योजकांनी नवीन उद्योग उभारणासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. या एमआयडीसमध्ये वस्त्रोद्योग, प्लास्टिक उद्योग व कृषिपूरक उद्योग असे एकूण तीन झोन करण्यात आलेले आहेत. हा प्रकल्प नामांकित व पर्यावरणापुरक असेल. तसेच शासनाच्या जेवढ्या योजना आहेत या सर्व सवलती उद्योजकांना मिळून देण्यासाठी  सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे भुसे यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com