agriclture news in marathi,Nashik: The main focus is to provide 55 liters of pure water per person per day till 2024 | Page 2 ||| Agrowon

नाशिकः २०२४ पर्यंत प्रति दिन,प्रति माणसी ५५ लिटर शुद्ध पाणी पुरवणे हे मुख्य लक्ष 

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 नोव्हेंबर 2021

नाशिकः ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत ‘हर घर नल से जल’ अंतर्गत प्रति दिन, प्रति मानसी ५५ लिटर शुद्ध पाणी पुरवणे हे मुख्य लक्ष आहे. २०२४ पर्यंत प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोचविण्यासाठी अभियान स्वरूपात काम करण्याचे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी केले. 
 

नाशिकः ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत ‘हर घर नल से जल’ अंतर्गत प्रति दिन, प्रति मानसी ५५ लिटर शुद्ध पाणी पुरवणे हे मुख्य लक्ष आहे. २०२४ पर्यंत प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोचविण्यासाठी अभियान स्वरूपात काम करण्याचे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी केले. 

नाशिक प्रादेशिक विभागातील  पाच जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’ व ‘स्वच्छ भारत मिशन’ व अटल भूजल या योजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबईचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आयुक्त सी.डी.जोशी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव अभय महाजन आदि उपस्थित होते. 

जयस्वाल म्हणाले, ‘‘जलजीवन अभियान हे ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात विशेषत: महिलांच्या जीवनात सुलभता निर्माण करणारे असून या अभियानास लोक चळवळ बनविण्याचे आवाहन केले. जलजीवन मिशन अंतर्गत ‘९० दिवस मोहिम’ राबविण्यात येणार असून सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी अभियान स्वरूपात काम करावे,’’असे निर्देशही जयस्वाल यांनी दिले. 

यावेळी जलजीवन मिशन तसेच स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा २, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांचा आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक विभागात नियोजनपुर्वक काम करून विभागातील सर्व जिल्हयात उदीष्ट साध्य करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. 
 


इतर बातम्या
प्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट...पुणे ः प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट...
सोलापुरात कांद्याची दहा हजार टन आवकसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कांदा बीजोत्पादन संकटातखामखेडा, जि. नाशिक : चालू वर्षीच्या सततच्या...
सरकारने कापसाला दहा हजार रुपये हमीभाव...नागपूर : भारतीय बाजारपेठेत कापसाचे दर १० हजार...
केसर आंबा निर्यातीस मोठी संधी ः डॉ....औरंगाबाद : ‘‘या वर्षी देशांतून आंबा निर्यात खुली...
वाशीम जिल्ह्यात सिंचन व्यवस्था निर्माण...वाशीम ः जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या विकासासाठी,...
‘जालना पाटबंधारे’कडून भूसंपादनाची...औरंगाबाद : भूसंपादनाची कार्यवाही जालना पाटबंधारे...
कृषी योजनांत नगर राज्यात आघाडीवरनगर ः ‘‘कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ...
आंबेगावच्या ४०० श्रमिकांची ‘ई-श्रम...पुणे : केंद्र सरकारच्या, श्रम व रोजगार...
कनेरगावात ६५ एकरांवर मॉडर्न मार्केट...हिंगोली ः ‘‘जिल्ह्यातील वसमत येथील राष्ट्रीय...
वीजबिल थकबाकीवरून महाविकास आघाडीत कुरबूरमुंबई :  राज्यातील विविध पाणीपुरवठा संस्था...
औरंगाबाद जिल्ह्याची विकासकामांत घोडदौड...औरंगाबाद : ‘‘औरंगाबाद जिल्ह्याची विविध...
पुणे जिल्ह्यातील पशुधनाला मिळणार...पुणे ः ‘‘जिल्ह्याच्या ग्रामिण आणि दुर्गम भागातील...
सातारा जिल्हा बँकेचे कामकाज नेत्रदीपक...सातारा : ‘‘शेतीपूरक व्यवसायात व कर्जपुरवठ्यात...
परभणी जिल्ह्यात ‘रोहयो’ची १ हजार ७२०...परभणी ः जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
कृषी पंपाची वीज तोडणी न थांबविल्यास...यवतमाळ : ‘‘रब्बी पिकांना पाण्याची गरज असताना वीज...
धान खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा आंदोलनगडचिरोली : शासकीय आधारभूत केंद्रांवर धान विक्रीची...
टास्क फोर्समुळे योजना शेतकऱ्यांपर्यंत...नाशिक: संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने...
खानदेशात पीक कर्ज वितरण अत्यल्प ...जळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पीक कर्ज वितरण...
जळगावमधील बारा बाजार समित्यांच्या...जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सुमारे बारा कृषी...