agriclture news in marathi,Nashik: Sinnar water project report submitted to state government | Page 2 ||| Agrowon

नाशिक ः सिन्नरच्या पाणी प्रकल्पाचा अहवाल राज्य शासनास सादर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 डिसेंबर 2021

नाशिक : नाशिक व सिन्नरच्या विकासासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करणाऱ्या ‘गारगाई-वैतरणा-कडवा-देव लिंक’ नदी जोड प्रकल्पाचा अहवाल राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाला सादर केला आहे.

नाशिक : नाशिक व सिन्नरच्या विकासासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करणाऱ्या ‘गारगाई-वैतरणा-कडवा-देव लिंक’ नदी जोड प्रकल्पाचा अहवाल राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाला सादर केला आहे. नाशिक-सिन्नर तालुक्याचा पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी ही योजना राबविण्याचा प्रस्ताव खासदार हेमंत गोडसे व जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष इंजि. राजेंद्र जाधव यांनी केंद्र व राज्य शासनास सन २०१४ मध्ये सुचवला होता, अशी माहिती जाधव यांनी दिली. 

नाशिकला मोठे औद्योगिक प्रकल्प येण्यासाठी केंद्र शासनाच्या दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यात नाशिकचा समावेश होणे आवश्यक होते. मात्र पाणी उपलब्ध नसल्याने ‘दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर’च्या पहिल्या टप्यात नाशिकऐवजी औरंगाबादचा समावेश झाला होता. आता या नदी-जोडमधून पाणी उपलब्ध होत असल्याने केंद्र सरकारमार्फत आवश्यक निधी ‘दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर’च्या माध्यमातून नाशिक-सिन्नर-इगतपुरीसाठी उपलब्ध होणार आहे. 

सिन्नरच्या दुष्काळी भागास हा प्रकल्प वरदान ठरणार असून, तालुक्याचे एकूण २६२८० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तसेच तालुक्याची पिण्याच्या पाण्याची सन २०५१ पर्यंतची गरज या प्रकल्पातून भागवली जाणार आहे. संपूर्ण सिन्नर तालुक्याचा दुष्काळ दूर करणारी ही योजना आहे. या नदी जोड प्रकल्पासाठी गेल्या सात वर्षांपासून ते केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. या प्रकल्पास राज्य सरकारने जुलै २०१७ मध्ये तत्त्वतः मान्यता दिली होती. 

तीन महिन्यांपूर्वी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे पुढाकाराने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात बैठक होऊन या प्रकल्पाचा डीपीआर ऑक्टोबर-२०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पाटील यांनी दिले होते. त्यानुसार या नदी-जोड प्रकल्पाचा अहवाल पूर्ण झाला असून, या प्रकल्पास एकूण सहा हजार सहाशे चाळीस कोटी इतका खर्च येणार आहे. 

या प्रकल्पाचे ठळक वैशिष्ट्ये : 
पाणी उपशासाठी दहा ठिकाणी सौरउर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच सर्व धरणे रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट या उच्च तंत्रज्ञानाने बांधण्यात येणार आहेत. तसेच मोखाडा तालुक्यास सुद्धा ४५० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध होणार असून, आदिवासी भागाचा सुद्धा विकास होणार आहे.  

 
 


इतर बातम्या
भात खरेदी दराची वाढ शेतकऱ्यांच्या...राजापूर (जि. रत्नागिरी) ः अनियमित पाऊस, अतिवृष्टी...
जनावरांचे दवाखाने सक्षम करू : स्वामीसोलापूर ः ‘‘जिल्ह्यातील पशुसंवर्धन दवाखान्याच्या...
मराठवाड्यात २२.९८ लाख हेक्‍टरवर रब्बीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या...
‘चोसाका’कडील थकीत रक्कम त्वरित द्यावीचोपडा, जि. जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून...बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील...
परभणी जिल्ह्यात आणखी ३८.५१ कोटींची...परभणी : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
ठिबक, तुषार सिंचनाचे अनुदान वाढले ः...नांदेड : ‘‘शासनाने ठिबक तसेच तुषार सिंचनासाठी...
सालेगाव येथे सिंचनाच्या अनुशेषासाठी ॲड...कळमनुरी, जि. हिंगोली ः जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष...
लातूरमध्ये खरेदी केंद्रांवर तूर...लातूर : जिल्ह्यात हमीदराने तूर खरेदीसाठी नोंदणीला...
उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस?सध्या मध्य प्रदेशच्या मध्यभागी हवेचे कमी दाबाचे...
बँकांनी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे लिलाव...जयपूर - राजस्थानमधील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या...
दहावीपर्यंत शिक्षण असून हुकूमचंद तयार...दहावीनंतर शिक्षणाला रामराम ठोकणारे हुकूमचंद...
भारताच्या गहू अनुदान धोरणावर...भारत सरकारकडून देशांतर्गत साखर उद्योगासाठी (Sugar...
‘पोकरा’अंतर्गत ३२७ गावांसाठी १३०...औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (...
जादा दराने खतांची विक्री सात...नाशिक : रब्बी हंगामात शेतकऱ्यांची खतांना मागणी...
महिलांच्या विरोधाने दारू दुकान बंद सिंदी (रेल्वे) (जि. वर्धा) : दारूबंदी असलेल्या...
सोलापुरातील १३ साखर कारखाने ‘लाल यादी’तमाळीनगर, जि. सोलापूर ः यंदाच्या गाळप हंगामात...
जळगावात पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत रब्बी...जळगाव ः जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ दरम्यान...
उजनीतील बेकायदा प्रवासी बोंटिगवर कारवाई...पुणे : उजनी जलाशयातून करमाळा तालुक्यातील एक...
दोन नगर पंचायतीच्या निवडणुकीत बुलडाणा...बुलडाणा ः जिल्ह्यात दोन नगरपंचायतींचे निकाल लागले...