agriclture news in marathi,Ozar: A farmer puts an ax on a vineyard | Agrowon

ओझर : द्राक्षबागेवर शेतकऱ्याने घातली कुऱ्हाड

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 डिसेंबर 2021

ओझर : अवकळी पावसाने घडकुज झाली आणि द्राक्षबाग फेल गेल्याने दीक्षी (ता. निफाड) येथील शेतकरी ज्ञानेश्वर तांबडे यांनी मुलाप्रमाणे जपलेल्या दीड एकर  द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालविली.

ओझर : अवकळी पावसाने घडकुज झाली आणि द्राक्षबाग फेल गेल्याने दीक्षी (ता. निफाड) येथील शेतकरी ज्ञानेश्वर तांबडे यांनी मुलाप्रमाणे जपलेल्या दीड एकर  द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालविली.

निफाड तालुका मिनी कॅलिफोर्निया समजला जातो. ऊस, कांदा या नगदी पिकांबरोबरच द्राक्षाचे मोठे उत्पादन घेतले जाते. दोन वर्षांपासून द्राक्ष कोरोना महामारीने पिकवता अन्‌ विकताही आले नाहीत. त्यातच व्यापाऱ्यांनी कमी भावात द्राक्ष घेतली. काहींनी शेतकऱ्यांना गंडाही घातला. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आला. कधी विजेचा लपंडाव, तर कधी बेमोसमी हवामानाचा फटका, फवारणीचा वाढलेला खर्चामुळे वाढत चाललेला कर्जाचा बोजा,  अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णतः उद्‌ध्वस्त झाला असून, बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

कधीही भरून न निघणारे नुकसान दरवर्षी होच आहे. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा खंडित होणारा वीजपुरवठ्यामुळे दुहेरी संकटात बागा जपायच्या कशा, या चक्रव्यूहात सापडलेल्या दीक्षीचे शेतकरी ज्ञानेश्वर तांबडे यांनी दीड एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाडीचे घाव घालून उद्‌ध्वस्त केली.

 


इतर बातम्या
22 तारखेला कुठे होणार पाऊस?20 तारखेला दिवसभर राज्यातले हवामान कोरडे...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
लाळ्या खुरकूत साथीमुळे मलिग्रेत चार...आजरा, जि कोल्हापूर ः मलिग्रे पंचक्रोशीत लाळ्या...
वारणा साखर कारखान्याची निवडणूक...वारणानगर जि. कोल्हापूर : येथील श्री. तात्यासाहेब...
संपादित जमिनीला वाढीव मोबदला द्या अकोला : जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत...
ज्युनिअर आर. आर पाटलांनी कवठेमहांकाळचं...सांगली - संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या...
गडचिरोलीचे हत्ती गुजरातला नेण्याचा घाटगडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...