agriclture news in marathi,Palghar's approved development fund withdrawn for the seventh time | Agrowon

पालघरचा मंजूर विकासनिधी सातव्यांदा माघारी 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 नोव्हेंबर 2021

पालघरः मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी दर वर्षी सरकारकडून कोट्यवधींचा विकासनिधी प्राप्त होतो; परंतु हा निधी खर्चच होत नसल्याने तो पुन्हा सरकारकडे जमा होत असल्याची बाब उघडकीस आली आहे.

पालघरः मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी दर वर्षी सरकारकडून कोट्यवधींचा विकासनिधी प्राप्त होतो; परंतु हा निधी खर्चच होत नसल्याने तो पुन्हा सरकारकडे जमा होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे सात वर्षांपूर्वी जिल्ह्याची स्थापना झाली. तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्याने कोणत्याही आर्थिक वर्षात पूर्ण विकासनिधी खर्च केलेला नाही.

जिल्हा नियोजन मंडळाच्या १८ नोव्हेंबरला बैठक पार पडली. या वेळी सुधारित आराखडा व २०२१-२२ या आर्थिक वर्षातील ऑक्टोबरपर्यंतच्या खर्चाची माहिती देण्यात आली. जिल्हा परिषदेला २०२०-२१ या आर्थिक वर्षात ४४९ कोटींच निधी मिळाला. त्यापैकी १७९ कोट रुपये अजूनही शिल्लक आहेत. या आर्थिक वर्षात २७८ कोटी ६९ लाख ५८ हजार आदिवासी उपयोजनेअंतर्गत खर्च करण्यात आले आहेत. आर्थिक वर्षाच्या अखेरीस यातील केवळ १६६ कोटी चोवीस हजार खर्च झाले तर ११४ कोटी ६७ लाख ४७ हजार इतकी रक्कम शिल्लक आहे. 

विशेष बाब म्हणून जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध सात कोटी ३५ लाख ५४ हजारांचा निधीही खर्च झाला नाही; तर महिला बालकल्याण अंतर्गत असलेला निधीही ५० टक्केच खर्च झाला आहे. जिल्ह्यासाठी दिलेला निधी खर्च होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. 

सरकारी विभागांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. शिवाय पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचेही नियंत्रण नाही. त्यामुळे विकास खुंटला आहे. 
- सुरेखा थेतले, जिल्हा परिषद गटनेत्या, भाजप 


इतर बातम्या
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल...वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government)...
रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा...पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने...
युपी काँग्रेसची घोषणा : कर्जमाफी, गहू-...वृत्तसेवा - उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यास...
मराठवाड्यातील पाणीसाठा ८५ टक्‍क्‍यांवर औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांमधील...
कोरोना संसर्गाच्या निदानासाठी चाचण्या...बुलडाणा : ‘‘कोरोनाची तिसरी लाट सध्या सुरू आहे. या...
ग्रामपंचायतीचे शंभर टक्के कर भरल्यास...पुणे : थकीत कर वसुलीसाठी मावळ तालुक्यातील घोणशेत...
अमरावती : पोलिस अधिकाऱ्याच्या...अमरावती ः भारतीय पोलिस सेवेत असलेल्या एका युवा...
पंढरपुरातील विकासकामे दर्जेदार व्हावीत...सोलापूर ः पंढरपुरात वारीनिमित्त लाखो भाविक येतात...
अमरावती विभागात १५ हजार हेक्‍टर पिकांचे...अमरावती ः खरिपानंतर रब्बी हंगामातील पिकांनादेखील...
कोल्हापुरातील १६, तर सांगलीतील चार...कोल्हापूर : कृषी ग्राहकांची चालू व थकीत...
जळगावमधील १७५ गावांमध्ये पाणी योजना...जळगाव : जिल्ह्यातील १७५ गावांचा पाणीप्रश्‍न...
22 तारखेला कुठे होणार पाऊस?20 तारखेला दिवसभर राज्यातले हवामान कोरडे...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
लाळ्या खुरकूत साथीमुळे मलिग्रेत चार...आजरा, जि कोल्हापूर ः मलिग्रे पंचक्रोशीत लाळ्या...
वारणा साखर कारखान्याची निवडणूक...वारणानगर जि. कोल्हापूर : येथील श्री. तात्यासाहेब...
संपादित जमिनीला वाढीव मोबदला द्या अकोला : जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत...
ज्युनिअर आर. आर पाटलांनी कवठेमहांकाळचं...सांगली - संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या...
गडचिरोलीचे हत्ती गुजरातला नेण्याचा घाटगडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...