परभणी ः मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषी निविष्ठा विक्रेते, जिनिंग उद्योजकांसाठी प्रशिक्षण 

परभणी ः कपाशीवरील गुलाबी बोंड अळीवर अद्याप पू्र्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. शेतकऱ्यांसोबत कृषी निविष्ठा विक्रेते, जिनिग उद्योजकांनी एकत्रित प्रयत्न केल्यास प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य होईल, असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले.
Parbhani: Training for Agricultural Inputs Vendors, Ginning Entrepreneurs at Marathwada Agricultural University
Parbhani: Training for Agricultural Inputs Vendors, Ginning Entrepreneurs at Marathwada Agricultural University

परभणी ः कपाशीवरील गुलाबी बोंड अळीवर अद्याप पू्र्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. शेतकऱ्यांसोबत कृषी निविष्ठा विक्रेते, जिनिग उद्योजकांनी एकत्रित प्रयत्न केल्यास प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य होईल, असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कापूस संशोधन योजनातर्फे नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्था पुरस्‍कृत कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्पांतंर्गत कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर कृषी निविष्ठा विक्रेते आणि जिनिग उद्योजक यांच्याकरिता मंगळवारी (ता. १५) प्रशिक्षण घेण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. वासकर होते. जिल्हा कृषी उपसंचालक बी. एस. कच्छवे, कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. के. एस. बेग, कापूस संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. अशोक जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

कच्छवे म्हणाले, ‘‘कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी स्वत:चे ज्ञान अद्ययावत ठेवावे.’’  डॉ. बंटेवाड म्हणाले, ‘‘किडीचे व्यवस्थापन करताना निव्वळ रासायनिक कीटकनाशकावर अवलंबून न राहता इतर पद्धतीचाही अवलंब करावा.’’  डॉ. बेग म्हणाले, की कुठलेही तंत्रज्ञान जास्त दिवस टिकविण्यासाठी त्याचा अतिरेकी वापर टाळावा. 

डॉ. बी. व्ही. भेदे यांनी गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन, डॉ. ए. टी. दौंडे यांनी कापूस रोग व्यवस्थापन आणि डॉ. डी. डी. पटाईत यांनी कीटकनाशकाचा सुरक्षित वापर यावर माहिती दिली. प्रास्ताविकात डॉ. अशोक जाधव यांनी कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्पाच्‍या कार्याचा आढावा मांडला. या वेळी कापूस दिनदर्शिका २०२२ व कापूस लागवड तंत्रज्ञान या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी आभार ऋषिकेश औंढेकर यांनी मानले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com