agriclture news in marathi,Power outages in many villages in Khandesh | Page 2 ||| Agrowon

खानदेशात अनेक गावांमधील शिवारात वीज बंद 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021

जळगाव ः  खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबारमधील अनेक गावांमधील शिवारात ऐन रब्बी हंगामात कृषिपंपांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी वीजबिले चुकीकी, अवास्तव असल्याचे सांगून ही बिले भरणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. 

जळगाव ः  खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबारमधील अनेक गावांमधील शिवारात ऐन रब्बी हंगामात कृषिपंपांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी वीजबिले चुकीकी, अवास्तव असल्याचे सांगून ही बिले भरणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. 

जळगाव तालुक्यात किंवा जळगाव ग्रामीणमध्ये शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. वारंवार वीज कंपनीचे कर्मचारी विजबिलांसाठी वीजपुरवठा खंडित करीत आहेत. नुकताच फुपनगरी (ता.जळगाव) येथे एका झिरो वायरनमने बरडे शिवारात बाळू जगन जाधव यांच्या शेतानजीक रोहित्राचा वीजपुरवठा बंद केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. सत्तेत येण्यापूर्वी वीजबिल माफी, २४ तास मोफत विजेची घोषणा केली जात होती आणि आता शेतकऱ्यांना वीजबिलांसाठी वेठीस धरले जात आहे.

ऐन रब्बी हंगामात वीज बंद करून शेतकऱ्यांची कोंडी करणे लोकप्रतिनिधींना महागात पडेल, असा संताप शेतकरी व्यक्त करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात सुमारे ६०० गावांमध्ये कृषिपंपांचा वीजपुरवठा बंद आहे. ज्यांनी बिले भरली, त्यांचीच वीज सुरू केली जात आहे. अशात काही तुपाशी तर काही उपाशी अशी स्थिती तयार झाली आहे. धुळ्यातही शिरपूर भागात वीज बंद करण्याची मोहीम सुरू आहे. नंदुरबारातही तळोदा, नवापूर भागात शेतकरी वीज बंद मोहिमेने त्रस्त झाले आहेत. किती दिवस सरकार शेतकऱ्यांची कोंडी करणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. 


इतर बातम्या
भात खरेदी दराची वाढ शेतकऱ्यांच्या...राजापूर (जि. रत्नागिरी) ः अनियमित पाऊस, अतिवृष्टी...
जनावरांचे दवाखाने सक्षम करू : स्वामीसोलापूर ः ‘‘जिल्ह्यातील पशुसंवर्धन दवाखान्याच्या...
मराठवाड्यात २२.९८ लाख हेक्‍टरवर रब्बीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या...
‘चोसाका’कडील थकीत रक्कम त्वरित द्यावीचोपडा, जि. जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून...बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील...
परभणी जिल्ह्यात आणखी ३८.५१ कोटींची...परभणी : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
ठिबक, तुषार सिंचनाचे अनुदान वाढले ः...नांदेड : ‘‘शासनाने ठिबक तसेच तुषार सिंचनासाठी...
सालेगाव येथे सिंचनाच्या अनुशेषासाठी ॲड...कळमनुरी, जि. हिंगोली ः जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष...
लातूरमध्ये खरेदी केंद्रांवर तूर...लातूर : जिल्ह्यात हमीदराने तूर खरेदीसाठी नोंदणीला...
उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस?सध्या मध्य प्रदेशच्या मध्यभागी हवेचे कमी दाबाचे...
बँकांनी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे लिलाव...जयपूर - राजस्थानमधील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या...
दहावीपर्यंत शिक्षण असून हुकूमचंद तयार...दहावीनंतर शिक्षणाला रामराम ठोकणारे हुकूमचंद...
भारताच्या गहू अनुदान धोरणावर...भारत सरकारकडून देशांतर्गत साखर उद्योगासाठी (Sugar...
‘पोकरा’अंतर्गत ३२७ गावांसाठी १३०...औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (...
जादा दराने खतांची विक्री सात...नाशिक : रब्बी हंगामात शेतकऱ्यांची खतांना मागणी...
महिलांच्या विरोधाने दारू दुकान बंद सिंदी (रेल्वे) (जि. वर्धा) : दारूबंदी असलेल्या...
सोलापुरातील १३ साखर कारखाने ‘लाल यादी’तमाळीनगर, जि. सोलापूर ः यंदाच्या गाळप हंगामात...
जळगावात पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत रब्बी...जळगाव ः जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ दरम्यान...
उजनीतील बेकायदा प्रवासी बोंटिगवर कारवाई...पुणे : उजनी जलाशयातून करमाळा तालुक्यातील एक...
दोन नगर पंचायतीच्या निवडणुकीत बुलडाणा...बुलडाणा ः जिल्ह्यात दोन नगरपंचायतींचे निकाल लागले...