agriclture news in marathi,Pressure on vegetable doors in Songir market | Agrowon

सोनगीर, जि.धुळे ः सोनगीर बाजारात भाजीपाला दरांवर दबाव 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 जानेवारी 2022

सोनगीर, जि.धुळे ः सोनगीर बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात मोठी घसरण झाली आहे. भाजीपाला उत्पादकांना मोठा फटका बसला असून, ग्राहक सुखावला, विक्रेतेही खूष आहेत. मात्र, गेल्या महिन्यात सध्याच्या तुलनेत दुप्पट दर होते. 

सोनगीर, जि.धुळे ः सोनगीर बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात मोठी घसरण झाली आहे. भाजीपाला उत्पादकांना मोठा फटका बसला असून, ग्राहक सुखावला, विक्रेतेही खूष आहेत. मात्र, गेल्या महिन्यात सध्याच्या तुलनेत दुप्पट दर होते. 

यंदा परिसरात चांगला पाऊस झाल्याने अद्यापही विहिरी भरलेल्या आहेत. अधिकाधिक शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादनावर भर दिला. दर वर्षी हिवाळ्यात भाजीपाला कडाडलेला असतो. यंदा मात्र याउलट परिस्थिती आहे. येथील बाजारात सध्या सर्वांत स्वस्त मुळा, तर शेवग्याच्या शेंगांना सर्वाधिक भाव आहे. घाऊक दरात मुळा आठ ते दहा रुपये प्रतिकिलो आहे, तर शेवगा शेंगांचे ८० ते ९० रुपये दर आहेत. बटाटे, काकडी, गाजर, टोमॅटो १५ ते २० व कांदे १० ते २० रुपये किलो आहे. मेथी, कोथिंबीर, कांदापात, दुधी भोपळा २० ते २५ रुपये आहे. वाटाणे, जाड हिरवी मिरची, भरताचे वांगे २५ ते ३० रुपये किलो आहे. वांगी व कोबी गड्डा २५ ते ३५ रुपये किलो आहे. शिंगरी, आंबटचुका, चवळी ३० ते ३५ रुपये, ढेमसे (गोल भेंडी) ३५ ते ४० रुपये, पोकळा, गिलके, भेंडी, फ्लॉवर, दोडकी, बारीक मिरची ४० ते ५० रुपये असे दर आहेत. हे दर घाऊक विक्रीचे असून, किरकोळ दर यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट आहेत. त्यामुळे ग्राहकांना कमी दर होऊनही तेवढा फायदा नाही, अशी स्थिती आहे. 

कांद्याने शेतकऱ्यांना रडवले 
कांद्याचे भाव अवघे ४०-५० रुपये किलो झाले, तरी भाववाढीची ओरड करणारी मंडळी आता कुठे आहेत, अशी संतप्त विचारणा शेतकरी करीत आहेत. अवघ्या दहा ते १५ रुपये किलो दराने कांदा विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाल्याच्या घसरलेल्या दराने रडविण्याचे काम जणू केले आहे.  

 
 


इतर बातम्या
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...
‘अशोक’च्या निवडणुकीत ‘लोकसेवा’ची सत्ता...नगर ः श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
नगरमध्ये सहाशे शेतकऱ्यांना मिळणार... नगर ः शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत विक्रमी पेरणीनांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे...
शेतीमाल तारण योजनेत सात बाजार समित्याऔरंगाबाद : पणन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील...
‘स्वाभिमानी’चे पीकविम्यासाठीचे ठिय्या...बुलडाणा : पीकविम्याच्या मुद्यावर चिखलीमध्ये...
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...