agriclture news in marathi,Rains continue in Khandesh | Agrowon

खानदेशात पावसाचा धुमाकूळ सुरूच 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 नोव्हेंबर 2021

जळगाव ः  खानदेशात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. गेल्या १० दिवसांत तीनदा जोरदार ते मध्यम पाऊस विविध भागांत झाला आहे. गेल्या तीन दिवसांत सातपुडा पर्वतात व लगत जोरदार पाऊस झाल्याने कांदा, कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. 

जळगाव ः  खानदेशात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. गेल्या १० दिवसांत तीनदा जोरदार ते मध्यम पाऊस विविध भागांत झाला आहे. गेल्या तीन दिवसांत सातपुडा पर्वतात व लगत जोरदार पाऊस झाल्याने कांदा, कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. 

पेरणी, कांदा काढणी, मळणीची कामे ठप्प आहेत. कारण पाऊस व पावसाळी वातावरण कायम आहे. अतिवृष्टी किंवा गारपीट कुठेही झालेली नसल्याची माहिती आहे. परंतु पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. उघड्यावरील चारा किंवा कडब्याची नासाडी होत आहे. अनेक शेतकऱ्यांचे सूर्यफूल पीक काढणीवर आहे. पण या पिकाचेही पावसाने नुकसान होत आहे. केळी अनेक भागात काढणीवर आहे. परंतु काढणी रखडत सुरू आहे. कारण शेतरस्ते खराब झाले आहेत. तसेच खरेदीदारदेखील नुकसान, विलंब आदी कारणांमुळे काढणीला येत नसल्याचे चित्र आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची काढणी केली होती. परंतु कांदा तयार करून तो बाजारात पोहोचविणे अशक्य झाले आहे. कारण पावसामुळे पिकाची नासाडी झाली असून, दर्जावरही परिणाम झाला आहे. कोरड्या वातावरणाची गरज आहे. 

गेल्या शनिवारी (ता. २०) जळगावमधील यावल, चोपडा, जळगाव, धरणगाव आदी भागांत जोरदार पाऊस झाला. सोमवारीदेखील (ता. २२) पाऊस अनेक भागात झाला. त्यापूर्वी गुरुवारी (ता.१८) मध्यरात्रीनंतर जोरदार पावसाने जळगाव, धरणगाव, एरंडोल, भुसावळ, पाचोरा, चोपडा आदी भागांत हजेरी लावली. कोरडे वातावरण अजूनही तयार झालेले नाही. यामुळे शेतीकामे ठप्प असल्याची स्थिती आहे. कापसावर प्रक्रिया करणारे कारखानेदेखील रखडत सुरू आहेत. कारखान्यांमध्ये साठविलेला कापूस सुरक्षित भागात ठेवण्यात आला आहे.  

 
 


इतर बातम्या
...तर विमा कंपन्यांवर  गुन्हे दाखल...पुणे : शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे वेळेत न...
आंदोलन सुरूच राहणार : संयुक्त किसान...नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात...
राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने उघडीप दिली...
परळी थर्मलमध्ये इंधनासाठी बांबूचा वापर...लातूर ः परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात...
पेप्सिकोच्या बटाटा वाणाचे  मालकी हक्क...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः केंद्र सरकारच्या...
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
दर्जेदार कृषी विद्यापीठांत  राज्याला...पुणे ः देशातील पहिल्या २० दर्जेदार कृषी...
पुणे जिल्ह्यात १,२४५ ‘विकेल ते पिकेल’...पुणे : शेतीमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव...
पुणे जिल्ह्यात धरणांत एक टीएमसी...पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ...
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ३६८...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या...
सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे...सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार...
सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाची...सांगली ः जिल्हा बँकेत अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव...
नंदुरबार : पशुसंवर्धन विभागाच्या...नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ या...
नंदुरबार : रब्बीचे अनुदानित बियाणे...नंदुरबार : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात मका लागवड घटणार  गहू, बाजरीची...जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत....
नांदेड जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीचे...नांदेड : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी...